Hot Posts

6/recent/ticker-posts

जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काळदरी खोऱ्यातील धनकवडीत भात लागवड सासवड प्रतिनिधी: जिजामाता हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काळदरी खोऱ्यातील धनकवडी गावात भात लागवडीसह अभ्यासक्रम पूरक, उपक्रम राबवले यामध्ये भात रोपाची काढणी, प्रत्यक्ष लावणी, डोंगराळ गावच्या परंपरा, प्रथा आणि व्यथा, गावाकडची जीवन रानमेवा, शेतातील कष्ट, रानातील वनस्पती आदी गोष्टी समजून घेतल्या, प्राचार्य नंदकुमार सागर, प्रा. मधुसूदन जगताप यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी धनकवडी गावचे नागरिक व शेतकरी यांनी मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. चंदुकाका जगताप यांच्या बरोबरीने शिक्षण क्षेत्रात काम करणारे कै. विठ्ठलराव ताकवलेे गुरुजी यांचे धनकवडी गावातील कुटुंबीय यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. रानातील दुपारच्या जेवणानंतर, या भात लावणीच्या उत्सवाची सांगता झाली. जिजामाता विद्यालयाच्या पूनम बाठे व श्वेतांबर बेलसरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनकवडीच्या मुख्याध्यापक कटके व दिपक गिरी यांनी या उपक्रमाचे नियोजन केले.

Post a Comment

0 Comments