पुरंदर तालुक्यातील सासवड येथे संत सावता माळी पालखी सोहळयाचे 25 जुलै रोजी प्रस्थान सासवड प्रतिनिधी: संत सावतामाळी यांची पालखी सासवड येथून, क्षेत्र अरण्य येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मार्गस्थ होणार असून, हा प्रस्थान सोहळा येत्या शुक्रवारी 25 जुलै रोजी संपन्न होणार आहे. गेली नऊ वर्ष ही पालखीची परंपरा सुरू असून, संत सोपान देव मंदिरात बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सकाळी प्रस्थान सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती सोहळ्याचे प्रमुख दिलीप महाराज झगडे यांनी दिली. नऊ दिवसाची ही पायी वारी असून, 25 जुलैला सकाळी संत सोपान देव मंदिरात दोन्ही पादुकांची भेट होऊन, नगर प्रदर्शना व महाप्रसादाने सोहळा सुरू होणार आहे. 25 जुलै रोजी पहिला मुक्काम जेजुरीच्या दवणे मळा येथे राहणार आहे, 26 जुलै मोरगाव, 27 जुलै करा वांगज, 28 जुलै भवानी शंकर, 29 जुलै शेळगाव, 30 जुलै निमगाव केतकी, 31 जुलै सरडे वाडी, 1 ऑगस्ट रोजी टेंभुर्णी, येथे होऊन 2 ऑगस्टला पालखी श्री शेत्र अरण्य भेंडी येथे पोहोचणार आहे. 3 ऑगस्ट रोजी संत सावतामाळी महाराज मंदिरात कालयाचे कीर्तन होणार आहे असे दगडे महाराज यांनी सांगितले. सुधाभाऊ गिरमे, रामभाऊ इनामके, अरविंद मेत्रे, आबा भोंगळे, चंद्रकांत गिरमे, अशोक टिळेकर, बाळासो राऊत, सुनील वढणे, बाळासो बोरावके, वामन भोंगळे, नामदेव बोरावके, सचिन वढणे, राजेंद्र लांडगे यासह अनेक समाज बांधव या सोहळ्याचे नियोजन करत आहेत.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments