Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातातील सासवड याठिकाणी सोपानदेव मंदीरात अभिषेक सासवड प्रतिनिधी: : संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा नामदेव शिंपी समाजाचे वतीने सासवड येथील नामदेव मंदीरात भक्तिभावाने साजरा झाला . या निमीत्ताने सकाळी जयश्री व राजेंद्र निवृत्ती निरगुडे यांचे हस्ते श्री सोपानकाका मंदीरात अभिषेक झाला . या नंतर नामदेव मंदिरात ह. भ. प नारायण महाराज गोसावी यांचे संत नामदेव महाराजांवरील काल्याचे कीर्तन होऊन, महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली . या संपूर्ण कार्यक्रमासाठी नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष गोविंदबापू बोत्रे , उपाध्यक्ष दिपक निरगुडे , सचिव वसंत चिंबळकर , संजय वसंतराव निरगुडे , रतन चिंबळकर , आबा क्षिरसागर , किशोर हेंद्रे , उदय निरगुडे , किशोर पोरे, सुनिल हेंद्रे , रमेश मांढरे , दत्तात्रय चिंबळकर , श्रीकांत कांबळे, सतिश निरगुडे , सुधीर हेंद्रे ,पोपट हेंद्रे , संजय हिरवे , ॲड दिलीप निरगुडे प्रभुती असंख्य समाज बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उदय निरगुडे यांचे विशेष प्रयत्न होते . ॲड दिलीप केशवराव निरगुडे , सासवड .याचे सहकायॅ मोलाचे मिळाले.

Post a Comment

0 Comments