पुरंदर रोटरी क्लब : प्रमोद धनावडे अध्यक्षपदी, डॉ. उमाकांत ढवळे सचिवसासवड येथे २०२५-२६ च्या पदग्रहण समारंभात 'चांगल्या कार्यासाठी एकत्र या' या नव्या थीमला प्रोत्साहन सासवड प्रतिनिधी : पुरंदर रोटरी क्लब ऑफ पुरंदरने २०२५-२६ या वर्षासाठी नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. सासवड येथील प्रमोद शंकर धनावडे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली असून, दंततज्ञ डॉ. उमाकांत ढवळे यांची सचिवपदी निवड झाली आहे. सासवड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभात ही माहिती जाहीर करण्यात आली. या सोहळ्यात सुनील जगताप यांनी उपाध्यक्ष म्हणून तर तुषार जगताप यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ चे २०२६-२७ चे प्रांतपाल नितीन ढमाले आणि सहाय्यक प्रांतपाल डॉ. राजेश दाते यांच्या हस्ते हा शानदार सोहळा पार पडला. ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा रोटरीयन राजवर्धिनी जगताप यांचीही याप्रसंगी विशेष उपस्थिती होती. 'आयडीयल स्टडी अॅप'चे वितरण: शिक्षणाप्रती रोटरीची कटिबद्धताया समारंभातील एक महत्त्वाचा आणि प्रेरणादायी क्षण म्हणजे पुरंदरमधील ग्रामीण भागातील शाळांमधील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आयडीयल स्टडी अॅप' चे वितरण. हे अॅप विद्यार्थ्यांच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना अधिक प्रभावीपणे अभ्यास करण्यास मदत करेल, असे इंदापूर रोटरी क्लबचे वसंत माळूंजकर यांनी सांगितले. यावेळी रोटरीचे माजी अध्यक्ष व संचालक अॅड. युवराज वारघडे, अनिल उरवणे, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. सुमित काकडे, गुलाबराव गायकवाड, अभिजित बारवकर, डॉ. विनायक बांदेकर, अॅड. आनंद जगताप, जीवन कड, भारती गायकवाड, कृष्णा शेट्टी, प्रा. संदीप टिळेकर, डॉ. संदीप होले, डॉ. सचिन कुदळे, डॉ. नितीन पांढरे, संतोष गायकवाड, आणि विश्वनाथ गायकवाड यांचा समावेश होता. या वर्षासाठी रोटरीची नवी थीम 'चांगल्या कार्यासाठी एकत्र या' याचेही अनावरण करण्यात आले. सामाजिक बांधिलकी आणि भविष्यातील योजनाप्रांतपाल नितीन ढमाले यांनी रोटरीच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, रोटरीचा निधी पूर्णपणे सामाजिक कार्यांसाठी आणि गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरला जातो. ग्रामीण भागासह सर्वत्र रोटरीचे विविध उपक्रम सुरू असून, भविष्यात ही कामे अधिक चांगल्या प्रकारे करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले.नवनिर्वाचित अध्यक्ष प्रमोद धनावडे यांनी त्यांच्या भाषणात, पुरंदर रोटरीचे संस्थापक दिवंगत चंद्रुकाका जगताप आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या विचारांनी प्रेरित होऊन काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामीण भागात आरोग्य सेवा, शैक्षणिक साधने पुरवणे आणि शुद्ध पाणी पुरवठा यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पदग्रहण समारंभाला माजी सनदी अधिकारी के. सी. कारकर, स्मिता वाघ, नितीन शहा, वसंत माळूंजकर, संतोष कुंभार, हेमलता माळूंजकर, प्राचार्य नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे यांसह तालुक्यातील विविध गावांतून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. फोटोओळ: सासवड (ता. पुरंदर): रोटरीकडून 'आयडीयल स्टडी अॅप' वितरीत करताना प्रांतपाल नितीन ढमाले, सहाय्यक प्रांतपाल डॉ. राजेश दाते, रोटरीयन राजवर्धिनी जगताप आणि इतर मान्यवर.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments