Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील मेजर ध्यानचंद क्रीडा प्रश्नमंजुषेत सानिका खेडेकर या प्रथम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघिरे महाविद्यालय सासवड ता. पुरंदर येथील महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या, प्रश्नमंजुषा स्पर्धा 2025 पार पडली असून, महिला गटात सानिका खेडेकर हिने 100 पैकी 100 गुण व पुरुष गटात यश रायभर यांनी 80 गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला. पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे त्रिनिटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांच्या हस्ते पार पडला. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती, स्पर्धेमध्ये तालुक्यातील दोनशे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता, यावेळी प्राचार्य डॉ. पंडित शेळके मनाले की, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आदर्श आजच्या पिढीने, घेणे गरजेचे आहे ,खेळा प्रती त्यांची असलेली निष्ठा प्रेम तरुण पिढीने, अंगीकारणे गरजेचे आहे, खेळाडूंनी प्रशिक्षणाच्या आधुनिक पद्धती शिकून घेणे यश संपादन करण्यासाठी गरजेचे असून, यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. शंकर लावरे डॉ. पंडित शेळके उपप्राचार्य डॉ. बी. यु. माने, डॉ. संजय झगडे, डॉ, संदीप राठोड, डॉ. व्ही.व्ही पाटणकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनीषा जगदाळे प्राध्यापक सुरेखा ढोरे, प्राध्यापक प्रतीक्षा जगताप, सलोनी राऊत, श्रद्धा देवडे यांनी विशेष असे परिश्रम घेतले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे: पुरुष गट यश रायभर प्रथम क्रमांक 80 गुण, रोहित कदम द्वितीय क्रमांक ७२ गुण, तृतीय क्रमांक श्रेयस जगताप 70 गुण. महिला गट सानिका खेडेकर 100 गुण, साक्षी दीक्षित 80 गुण, आर्या धुमे तृतीय क्रमांक 72 गुण.

Post a Comment

0 Comments