पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील प्रभारी मुख्याध्यापिकाची त्वरित बदली करावी; तर शिक्षण विभागाची टाळाटाळा अशी ग्रामस्थांची मागणी सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील शिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रभारी मुख्याध्यापिका उषा दिनकर कामथे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून, पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत ने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. शिवरी येथील जिल्हा परिषद शाळेत कामथे उषा या उपशिक्षिका म्हणून दि. 31 मे 2023 पासून, कार्यरत होत्या. त्या सध्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून, 5 डिसेंबर 2024 पासून कार्यरत आहेत, त्यांच्या गैरवर्तनाबाबत शाळा व्यवस्थापन समितीने दि. नऊ डिसेंबर 2024 रोजी गटशिक्षणाधिकारी व गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रारी केली होती, त्यांच्या मनमानी कारभाराची पूर्ण माहिती गटशिक्षण अधिकारी यांना अवगत करून दिली होती, परंतु ग्रामस्थांनी कामथे यांच्या विरोधात गट विकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे दि. 29 जानेवारी 2024 रोजी लेखी स्वरुपात तक्रार देखील केली होती, यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, पालक, नागरिकांनी गट शिक्षणधिकारी यांची भेट घेऊन, तक्रार केली होती परंतु, त्यावेळी गटशिक्षणाधिकारी हे दि. 21 जुलै रोजी पालक व नागरिकांच्या तक्रारीनंतर स्वत: शाळेमध्ये पाहणी करण्यासाठी आले होते, त्यावेळी गट शिक्षण धिकारी व स्वत: प्रभारी मुख्याध्यापिका यांच्यासमोर सर्व पालकांनी व ग्रामस्थ यांनी तक्रारीचा पाढा वाचला होता, तेव्हा त्यांना बचात्मक काहीच उत्तर देता आले नाही, प्रभारी मुख्याध्यापिका कामथे यांची शिवरी शाळेतून बदली त्वरित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती, ग्रामपंचायतींच्या मासिक बैठकीत प्रभारी मुख्याध्यापिकांची शिवरी गावातून लवकर बदली करण्याचा ठराव बहुमताने सहमत केला आहे, संबंधित प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष पुरंदर तालुक्यात लागून राहिले आहे, गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कोर्टात निर्णय होणार का? गटशिक्षण अधिकारी वैभव डुबल यांना दोन वेळा भ्रमणध्वनी वरून, संपर्क केला असता, त्यांनी संपर्क साधला नाही ,त्यानंतर डुबल यांच्या प्रतिक्रियेसाठी कार्यालयात गेल्यानंतर, ते प्रशिक्षणासाठी बाहेर गेलेले असून, ते सध्या नाहीत, अशी माहिती मिळाली असून, प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांचा चाजॅ असलेले लक्ष्मण लाखे म्हणाले की, आम्ही शाळेत भेट दिली आहे, नागरिकांचे म्हणणेही ऐकले आहे, ग्रामपंचायत आणि पालकांचे ठराव अर्ज मिळाले आहेत, गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल हे आल्यानंतर काय तो निर्णय घेऊ ,दरम्यान शिवरी जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांना फोन केला असता, त्या म्हणाल्या की, मी यावर काही बोलू शकत नाही, पंरतु त्यांनी संपर्क सुद्धा साधला नाही व त्या ठिकाणी अशा दुर्भाग्यपणामुळे त्यांची त्वरित बदली करावी, अशी शिवरी येथील ग्रामस्थांची मागणी असून, त्यांनी प्रत्यक्ष प्रतिनिधीला ही सर्व माहिती दिली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments