पुरंदर तालुक्यामध्ये सासवड पोलीस ठाण्याचा त्यांच्याच हद्दीमध्ये रूट मार्च सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: आत्ताच्या चालू गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव आदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सासवड शहरात रूट मार्च काढण्यात आला शहरातील श्रीनाथ चौक जयप्रकाश चौक अमर चौक चांदणी चौक बहिरम पुरा चौक बादशाही मशिद चौक चांदणी चौक कन्हैया चौक श्रीनाथ चौक ते सासवड पोलीस दलातर्फे या मार्गावर सशस्त्र रूट मार्च काढण्यात आला पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक नारायण खंडागळे अर्चना पाटील यांच्यासह वीस पोलीस अमलदार दहा.होमगार्ड दोन सरकारी वाहने व दोन सरकारी दुचाकी वाहनांचा या रूट मार्चमध्ये सहभाग होता आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान यावेळी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments