आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त सासवड या ठिकाणी बैठक संपन्न सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथील तहसील कार्यालयामध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारक समिती भिवडी यांच्या वतीने 7 सप्टेंबर रोजी होणाऱ्या शासकीय जयंती महोत्सवानिमित्त शासकीय यंत्रणा व स्मारक समिती यांच्या संयुक्त बैठकीचे मंगळवारी दि.26रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसिलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी भिवडी ता. पुरंदर येथील राजे उमाजी नाईक स्मारक परिसरातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली, यावेळी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सासवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण,विकास (ऊफॅ बल्ली )भांडवलकर,ओकार चव्हाण, यशवंत (ऊफॅ बिटु) भांडवलकर, गंगाराम जाधव,गणेश पाटोळे आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments