Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी साकारले बाप्पा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपती उत्सवाच्या औचित्य साधून पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून सुंदर गणेश मूर्ती तयार केल्या. शाळेतील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करून त्यावर सुंदर रंगकाम केले. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी मार्गदर्शन केले. वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गणपती उत्सवाची माहिती सांगितली, गणपती बाप्पाची गाणी म्हटली. बाप्पाला दूर्वा, फुले वाहून पूजा करून आरती केली. गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. यावेळी ' गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया' च्या जयघोषाने शाळेचा परिसर दुमदुमून निघाला होता. आपण तयार केलेल्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी सुंदर मखर, ताटात पाना फुलांचे सजावट करून आणली होती. गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या विद्यार्थ्यांना जयश्री काळाणे, संगीता कोल्हाळे, मनीषा जगताप, सुवर्णा वीर, अर्चना जाधव, सविता काळे, संगीता राऊत, दीप्ती गिरमे, शितल साळुंके , अश्विनी हळदीकर तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका मेघा जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे शाला समिती अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले.

Post a Comment

0 Comments