पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेने 21 डिसेंबरचा निकाल लागल्यानंतर सासवड मधील गुलाल नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धुतला सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर रस्त्यावर उधळलेला गुलाल आणि यामुळे शहर लाल झाले होते, मात्र सोमवारचा बाजार पुरंदर तालुक्यात सासवड या ठिकाणी असल्यामुळे, स्वत: हातात झाडू व टँकर घेऊन रस्ते स्वच्छ करण्याची मोहीम सासवड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हाती घेतली, सासवड मधील गुलाल हा सासवड नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी धुवून काढला, यासाठी या कृतीचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे, सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवारी दि. 21 रोजी जाहीर झाला निवडणुकीमध्ये भाजपचे नगरसेवक/ नगरसेविका 13 तर सासवड मधील नगराध्यक्ष हे भाजपचे झालेले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाचे 9 नगरसेवक/ नगरसेविका झालेल्या आहेत, निकाल हा जाहीर होताच सासवड शहरात जल्लोष करण्यात आला ,तर गुलाल उधळून रात्री उशिरापर्यंत प्रत्येकाने प्रभागांमध्ये आपली मिरवणूक काढून, उत्सव हा सुरू होता, परंतु दुसऱ्या दिवशी साधारण सोमवार या दिवशी चित्र पलटले असून, रस्त्यावर साचलेला गुलाल यामुळे लहान मुले, महिला, जेष्ठ नागरिक आणि आजारी रुग्णांना श्वासनाचा त्रास होऊ लागल्यामुळे, ही बाब लक्षात घेऊन, नवनिर्वाचित नगराध्यक्ष आनंदी (काकी )जगताप यांच्या आदेशानुसार सर्वत्र, सासवड मध्ये ही मोहीम राबवण्यात स्वच्छतेची आली,भरपूर ठिकाणी गुलालाचा थर साफ केला असून, सोमवार हा सासवडचा तालुक्यातील बाजार असल्यामुळे, त्या ठिकाणी साफसफाई करणे खूप गरजेचे होते, गुलालामुळे डोळे आणि त्वचेला त्रास होत होता ,पण नवे कारभाऱ्यांनी तत्काळ दखल घेतल्याने, बरे वाटले अशी प्रतिक्रिया सासवड शहरातील सामान्य नागरिकांची उमटलेली आहे, नव्या कारभाऱ्यासमोर सासवड शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत, विजयानंतर लगेचच स्वच्छता मोहीम राबवून त्यांनी सकारात्मक सुरुवात केलेली आहे, येत्या काळामध्ये सासवड शहर विकासाला गती मिळेल, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे, परंतु एक अनुचित प्रकार असा की सोमवार या दिवशी बाजार असल्याकारणाने, आत्तापर्यंत तीन ते चार महिन्यांमध्ये सासवड नगर परिषदेची कोणतीही मोहीम सासवड नगरपालिकेच्या गेट समोर फ्रुटची हातगाडी असलेली यावर कुठलीही मोहीम हाती अजून आलेली नाही, कारण म. ए.सो वाघिरे विद्यालयातील लहान मुलांची शाळा ही साडेपाच वाजता सुटते, तर प्रत्येक व्यक्ती या आपल्या पाल्याला घेऊन घरी जाताना, सासवड नगरपालिकेच्या गेट्स समोर फ्रुटच्या गाड्या ह्या लागलेल्या असतात, ट्राफिक खूप जाम होते, लहान मुलांना गाडीच्या गर्दीच्या ठिकाणातून घेऊन जाताना, जर एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी सासवड नगरपरिषद जबाबदार असणार का? तीन ते चार वर्ष झाले सासवड नगरपरिषदेवर प्रशासकीय राज असल्यामुळे, या ठिकाणी सोमवारच्या बाजाराच्या दिवशी गेट समोर असणाऱ्या फ्रुटच्या हातगाडीवर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई केलेली नाही, कारण ठेकेदाराकडून 50 रुपयाची पावती करून, त्या ठिकाणी नगरपालिकेला कर मिळत आहे, परंतु जर एखादा अपघात झाला तर त्या ठिकाणी सासवड नगरपालिका त्याची जबाबदारी घेणार का?परंतु पत्रकार महोदय यांनी सासवड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना फोन केला असता, या ठिकाणी म्हटले की, नगरपालिकेच्या गेट समोर फ्रुटची हातगाडी लागलेली असून, लहान मुलांना घरी घेऊन जाताना खूप ट्राफिक जाम झालेले आहे, लहान मुलांना घरी घेऊन जाताना खूप त्रास होत आहे, तर त्या ठिकाणी स्वतः पत्रकार महोदय यांनी सासवडचे पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस कुमार कदम यांना फोन केला असता, त्यांनी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस त्वरित सासवड नगरपालिकेच्या गेट समोर असणाऱ्या चौकामध्ये त्वरित पोलीस पाठवून त्या ठिकाणी असलेले ट्राफिक हे त्यांनी खुले करून दिले ,सासवड शहरातील नगर परिषदेमध्ये असणाऱ्या अडचणी वर ज्या काही गोष्टी असतील त्याची सोमवारच्या बाजाराच्या दिवशी त्याठिकाणी फ्रुटच्या हातगाडी या वेगळ्या ठिकाणी सोय केली जाईल, इथून पुढे विकासाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी नवे पर्व सुरू झाले असताना, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सासवड नगरपरिषदेच्या चौकामध्ये फ्रुटची हातगाडी येथून पुढे लावली जाणार नाहीत, त्याची योग्य अशी दक्षता घेऊन, त्यांना दुसऱ्या ठिकाणी योग्य अशी जागा दिली जाईल. नूतन नगराध्यक्षा आनंदी (काकी) चंदूकाका जगताप सासवड नगरपरिषद.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments