पुरंदर तालुक्यातील सासवड येथे भैरवनाथ चैत्री उत्सवानिमित्त बगाडचा कार्यक्रम सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड (ता. पुरंदर) येथे श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट सासवड आयोजित श्री भैरवनाथ चैत्री उत्सव 2026 या उत्सवात आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी बगाड कार्यक्रमाने याञेची सुरुवात झाली. पहाटे मंदिरात ग्रामस्थ व ट्रस्ट व उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देवांना अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर वाजत गाजत जुने भैरवनाथ मंदिर या ठिकाणी ग्रामस्थ व पुजारी यांच्या हस्ते देवांना मानाचा पानाचा विडा ठेवण्यात येऊन तेथे आरती करण्यात आली. त्यानंतर वाजत गाजत ही मंडळी मुख्य भैरवनाथ मंदिरात आली. येथे भैरवनाथांचे अश्वाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कळस ते बगाड अशी धज बांधण्यात आली. त्यानंतर बापूगिरी गोसावी यांना बगाडावर स्वार करण्यात आले फुलांची गुलालाची उधळण करीत व पारंपारिक हलगी ताशाच्या गजरात बगाडाला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. यावेळी गुलाल खोबरे याची उधळण करीत "नाथ साहेबांचा चांगभलं" चा गजर करण्यात आला. नंतर मंदिरात आरती होऊन बगाड कार्यक्रमाची सांगता झाली . यावेळी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट व श्री काळभैरवनाथ चैत्री उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती रवींद्र पंत जगताप व सचिव विठ्ठल शिंदे यांनी दिली. फोटो : सासवड (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ मंदिरासमोर पारंपारिक बगाड कार्यक्रम प्रसंगी भाविक.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments