Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील शिखर शिंगणापूरच्या यात्रेची खानवडी येथे सांगता सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: खळद ,खानवडी, एखतपुर, मुंजवडी, कुंभारवळण या पंचक्रोशीतील कावडीचे शनिवारी दि. 4 रोजी खानवडीत आगमन झाले, कावडीचे स्वागत मिरवणुकीने करण्यात आले, त्यानंतर शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली आणि पंचक्रोशीच्या वार्षिक यात्रोत्सवाला सुरुवात झाली, संत तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी शिवयोगी संत भूतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिखर शिंगणापूर यात्रे निमित्ताने कावडीची उभारणी केली होती, यानंतर अष्टमीला एकत्र येथे मिरवणुकीतून जळत्या घराची जागा, तेलाचा घाणा या ठिकाणी होम हवन केले, रामनवमीच्या दिवशी संत भूतोजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करेचे जल घेऊन, खळद येथे शाही मिरवणूक काढत कावडीने, शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान ठेवले होते की, यानंतर दोन ते तीन दिवसाचा प्रवास करत द्वादशीच्या दिवशी कावडीने अवघड मुंगी घाटाची चढण करत, येथील शंभू महादेवाला ज्यालाअभिषेक केला, एक दिवस येतील देवस्थानच्या वतीने मानपान स्वीकारून, कावडीने बुधवारी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पिंपळे पोमदनगर या गावाची कावड स्वागतासाठी आली असता.या दोन्ही कावडीच्या भेटीचा सोहळा पार पडला, त्यानंतरच शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता झाली.अशी माहिती संत तेल्या भुतयाचया कावीचे मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खलदकर यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments