राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रलंबित कामाबाबत चर्चा ;माजी आमदार संजय जगताप यांची अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक; उड्डाणपूल आणि रस्ता रुंदीकरणाचे प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर आणि हवेली तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामे, उड्डाणपूल आणि शहरांतर्गत रस्ते रुंदीकरण या विषयावर माजी आमदार संजय जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यासोबत पुण्यात सकारात्मक चर्चा केली ,सासवड, जेजुरी, निरा आणि फुरसुंगी या गावातील रखडलेली कामे, वाहतूक कोंडी, सोडवण्यासाठी विविध उपाय योजना करण्याच्या सूचना व मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत, पुणे येथील महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्राधिकरणाचे प्रबंधक एस.एस. कदम आणि अभियंता अभिजीत औटी व इतर अधिकारी आदी उपस्थित होते .यावेळी संजय जगताप यांनी पुरंदर हवेलीतील महत्त्वाच्या शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत, यामध्ये सासवड बाह्य वळणाच्या चंदन टेकडी आणि बोरावके मळा या दोन्ही ठिकाणी उड्डाणपूल उभारणे, सासवड हद्दीतील चंदन टेकडी ते बोरावके मळा या शहरातून जाणाऱ्या रस्त्यांचा पालखी महामार्ग लगत, समावेश करून भूसंपादनासह चौपदरीकरण करणे, याबरोबरच पिसुर्डी फाटा ते लोणंद बाह्य वळण या दरम्यानच्या पिसुर्डी फाटा ते निराशहर आणि निराश शहर ते लोणंद या रस्त्याचे भूसंपादन करून, चोपदरीकरण करणे ,जेजुरी शहरात वाहतूक सुलभतेसाठी उड्डाणपूल उभारणे, दिवे घाटातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे नवीन बांधकाम करणे, फुरसुंगी भेकराईनगर येथे उड्डाणपुलाची निर्मिती करणे, तसेच फुरसुंगी भेकराई नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुख्य डेनीज लाईन संदर्भात महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता व प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व अभियंता यांनी एकत्रित कामाची पाहणी करून, येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याबाबत चर्चा झाली, अधिकाऱ्यांचे सकारात्मक आश्वासन या मागण्यावर बोलताना प्रबंधक एस.एस. कदम आणि अभियंता अभिजीत औटी यांनी सांगितले की, सासवड आणि निरा शहरातील रस्ते भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव वरिष्ठाकडे तात्काळ सादर केला जाईल, सासवड येथील चंदन टेकडी आणि बोरावके मळा येथील उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे, जेजुरीतील उड्डाणपुलाचा नकाशा तयार असून, फुरसुंगी भेकराई नगर येथील उड्डाणपूल भविष्यातील मेट्रोच्या मार्गा केला असून, अनुसरून मेट्रो मार्ग एकतेचा विचार करूनच तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले, या बैठकीसाठी सासवडचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, गटनेते अजित जगताप, ज्ञानेश्वर गिरमे, ज्ञानेश्वर माऊली (काका) जगताप ,राजन (भैय्या) जगताप, प्रदीप राऊत, सोपान रणपिसे,साकेत जगताप, जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे, वडकीतील सचिन गायकवाड, फुरसुंगीतील रणजीत रासकर यांच्यासह सर्व आजी, माजी नगरसेवक व पदाधिकारी आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments