पुरंदर तालुक्यातील सासवड येथीलि शेठ गोविद रघुनाथ साबले निरोप समारंभ उत्साहात संपन्न सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथील शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी येथे दि. ०४ एप्रिल २०२६ रोजी निरोप समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी जाधव यांनी केले.अंतिम वर्ष फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. त्यानंतर प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच उपप्राचार्य डॉ. स्मिता पवार यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.प्रमुख पाहुणे डॉ. पंडित शेळके (प्राचार्य, वाघिरे कॉलेज, सासवड) यांनी विद्यार्थ्यांना भविष्याबाबत प्रेरणादायी संदेश दिला. यानंतर पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. प्रज्ञा जगताप, दीपाली जगताप व सुनिता भाटे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.कार्यक्रमाचा समारोप दीपाली जगताप यांनी आभार प्रदर्शनाने केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments