Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील मूळ दस्तऐवज लपवून खोट्या कागदपत्रांचा समावेश; यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची 2024 ची चौकशी करून, दोषी विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल त्वरित करावेत! सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायत येथील मूळ दस्तऐवज लपवून खोट्या कागदपत्रांचा समावेश व फेरफार ठराव मंजूर करून, तसेच बेकायदेशीर मासिक सभा ठराव मंजूर करून, अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन, खाजगी शेत जमीन गट नंबर 1213 याची नोंद ग्रामपंचायतच्या मालकीची असल्याची चुकीची नोंद गाव नमुना आठ नोंदवही मध्ये केल्याने, संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांची चौकशी करून दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आतापर्यंत विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी हे ग्रामसेवक यांना पाठीशी का? घालत आहेत? कोणतीही चौकशी होत नाही, ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देतो, विस्तार अधिकारी काही कारवाई करत नाहीत, तर गट विकास अधिकारी नुसते सांगतात की चौकशी करायला लावली आहे, परंतु गट विकास अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत नक्की हे कशासाठी? कोणासाठी? पुणे जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश 2022/ 2023 जा. क्र. जिल्हा परिषद/ पंचायत समिती चौदा / 6/ 34/ 23, 10 जानेवारी 2023 च्या प्रशासकीय मान्यता आदेशातील मुद्दा क्रमांक एक नुसार प्रस्तावित काम नायगाव सिद्धेश्वर मंदिर परिसर रस्ता कॉंक्रीट रस्ता 20 लक्षच्या ग्रामपंचायती नमुना नंबर 23 ताब्यातील रस्त्याच्या नोंदवही मधील रस्त्याच्या नोंदी स मान्यता प्रशासकीय आदेश दिल्याचे दिसून येत आहे, सदर 6 मार्च 2024 मधील उप अभियंता बांधकाम विभाग पुणे यांना' क वर्ग 'तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत काँक्रीट रस्ता जागे करिता हरकत नसल्याबाबतचा पत्र दिसून येत आहे, सदर रस्त्याची नमुना ग्राम दप्तरी नोंद ही दिसून येत नाही, सदरील मुद्दा क्रमांक चार व पाच हा ग्रामपंचायतीच्या मासिक सभा 22 मार्च 2024 रोजी विषय क्रमांक एक ठराव क्रमांक एक नुसार गावठाण हद्दीतील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील परंतु ज्याची ग्रामपंचायत मध्ये दप्तरी नोंद नाही, मोकळी बक्कळ जागा आहे ,अशा जागेची नोंदणी ही सिद्धेश्वर मंदिर परिसरात सुशोभीकरण करणे, कामाकरिता नोंद केल्याची स्पष्ट दिसून येत आहे, या नोंदीमध्ये खूप अप्ररातफर ग्रामसेवक यांची आहेत. कार्यकारी अभियंता व उपअभियंता बांधकाम विभाग कडून जागेबाबत ग्रामपंचायत नायगावला पत्र व्यवहार केले बाबतची कागदपत्रे ग्रामपंचायत इकडून चौकशीमध्ये दिसून आलेली नाहीत, सदर बख्खल जागेची नोंद ग्रामपंचायत नमुना नंबर आठ अ क्रमांक नंबर 969 मिळकत 814 नोंद घेतल्याचे दिसत आहे, 28 नोव्हेंबर 2024 मध्ये दाखल्यानुसार नायगाव सिद्धेश्वर मंदिर परिसर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, लेखा शीर्ष 3604-0621' क वर्ग तीर्थक्षेत्र कार्यक्रमांतर्गत मंजूर काम ज्या ठिकाणी झाले आहे, त्या ठिकाणची दप्तरी नमुना नंबर 23 ला रस्त्याच्या नोंदीचे रजिस्टर यामधील नोंद नाही, असा सुद्धा दाखला दिसून येत असून ,यावर आदेश पारित झाल्यावर, तत्कालीन पंकज शेळके गट विकास अधिकारी यांनी त्वरित आदेश दिले होते की, फौजदारी गुन्हे यांच्यावरती दाखल करावेत, परंतु त्यांची त्यावेळी बदली झाली होती, त्यापासून ते आत्तापर्यंत आत्ताच्या विस्तार अधिकाऱ्यांनी व गटविकास अधिकारी यांनी प्रणोती श्रीमाळ यांनी ग्रामसेवकाला पाठीशी का? घातले आहे, फौजदारी गुन्हे का? दाखल केले नाहीत, व कशासाठी का? असा सवाल प्रत्यक्ष जागेचे मूळ मालक बबन रामभाऊ कड त्यांनी असे सांगितले आहे की, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी मला विश्वासात अजिबात घेतले नाही ,मनमानी कारभार केलेला आहे, यावर एक ते दोन वर्ष झाले विस्तार अधिकारी व गट विकास अधिकारी फक्त बग्याची भूमिका घेत आहेत ,तर या सर्वावर कठोरातील कठोर अशी कारवाई त्वरित करून, फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी कड यांनी केलेली आहे. बबन रामभाऊ कड यांनी याबद्दल सविस्तर माहिती ही प्रतिनिधीला दिलेली आहे.

Post a Comment

0 Comments