डबल महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे ठरलानवखंडेनाथ कुस्ती आखाडाचा मानकरी पै. सॅटी पंजाबी ठरला उपविजेता गराडे येथील कुस्ती आखाड्यात १४४ मल्लांचा सहभाग...... सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व पंजाब नॅशनल चॅम्पियन सॅटी पंजाबी यांच्यात लढत होऊन शिवराज राक्षे याने कुस्ती चित्रपट करीत एक लाख रुपयाचे विजयी इनाम जिंकले.एप्रिल रोजी कुस्त्यांचा आखाडा झाला. यात १४४ मल्लांनी हजेरी लावली.आखाड्यातील शेवटची कुस्ती पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस गंगारामदादा जगदाळे यांचे हस्ते लावण्यात आली.पंच म्हणुन पै.पांडाभाऊ जगदाळे, पै.सोनबा जगदाळे, पै. दिलीप मुलाणी,पै.लक्ष्मण जगदाळे , पै.विजय जगदाळे,पै.विश्वनाथ ढोणे,पै. प्रदिप ढोणे,पै.कैलास वाडकर,पै.विकास जगताप,पै.शिवाजी जगदाळे,पै.सागर जगदाळे यांनी काम पाहिले. या वेळी पुणे जिल्हा भाजपा सरचिटणीस गंगारामदादा जगदाळे, शिवसेना नेते विजय ढोणे, सरपंच नवनाथ गायकवाड,अमित दूरकर, दत्तात्रय जगदाळे,निलेश जगदाळे, समीर तरवडे, नितीन जगदाळे,सुनील जगदाळे ,संजय जगदाळे,मोहन जगदाळे ,अॅड. भास्कर जगदाळे,संतोष जगदाळे,विकास सागडे,चेतन जगदाळे,आबासाहेब जगदाळे, बंडुनाना जगदाळे,लहुनाना जगदाळे ,संजय रावडे ,बाळासाहेब रानडे, बाळासाहेब दुरकर, उत्तम ढोणे, बाळासाहेब यादव , दिपक जगदाळे, नारायण जगदाळे,मोहन घारे,धोंडीबा खवले, रोहित खवले,चेअरमन दत्तात्रय जगदाळे,पोलीस पाटील सुरेश जगदाळे , सदाशिव रावडे,अशोक जगदाळे, अविनाश जगदाळे,लक्ष्मण पांढरे,विजय राऊत ,आशू जगदाळे, विठ्ठल चौधरी, समीर जगदाळे, स्वप्निल जगदाळे, शिवाजी जगदाळे , अजित घारे, विनोद ढोणे, सचिन ढोणे, अमोल जगदाळे ,हनुमंत साळुंखे, सदाशिव रावडे संदीप जगदाळे, प्रथमेश अत्रे आदीसह गराडे पंचक्रोशीतील कुस्ती शौकीन उपस्थित होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष योगेश जगदाळे व कुस्ती निवेदक सागर चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. अत्यंत शिस्तबद्ध व नियोजित पद्धतीने सुरू असलेल्या नवखंडेनाथ निकाली कुस्ती आखाड्यात मनिष रायते ,विक्रम घोरपडे, मोहन पाटील, शंकर बंडगर ,प्रतिक जगताप, पृथ्वीराज खडके, यश वासवंड, रोहन जाधव प्रथमेश ढोणे, ओम शिळीमकर यांच्या देखील तुफानी लढती संपन्न झाल्या. त्याचबरोबर महान भारत केसरी विजय गावडे, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, उपमहाराष्ट्र केसरी नामदेव भोसले ,फुलाजी लिम्हण,कुस्ती चॅम्पियन मारुती सातव यांनी हजेरी लावली. गराडे येथील नवखंडेनाथ देवाचा उत्सव ३ एप्रिल रोजी सुरु झाला. या दिवशी पहाटे ५ वा. नवखंडेनाथांना अभिषेक घालुन महापुजा करण्यांत आली. सकाळी ग्रामस्थांची वैयक्तिक पुजा व विधी कार्यक्रम झाला. त्यानंतर ढोल, लेझिम छबिण्यांच्या हजेरीचा कार्यक्रम व नाथांच्या मिरवणुकीचा कार्यक्रम पार पडला. ४ एप्रिल रोजी आनंद लोकनाट्य मंडळ जळगाव यांच्या लोकनाट्याच्या कार्यक्रमानंतर यात्रेची सांगता झाली, अशी माहिती पोलिस पाटील सुरेश जगदाळे व नवखंडेनाथ मित्र मंडळाचे अध्यक्ष चेतनदादा जगदाळे यांनी दिली. ------------------------------ बातमीसोबत फोटो पाठवित आहे. फोटो ओळीः- गराडे ( ता. पुरंदर ) येथील कुस्ती आखाड्यात पै. शिवराज राक्षे व पै.सॅटी पंजाबी यांची मानाची कुस्ती लावताना गंगारामदादा जगदाळे
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments