Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील श्री शेत्र वीर रस्त्यावर धोकादायक असणारी विहीर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : श्री क्षेत्र वीर ता. पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात, सासवड वरून वीर कडे जाताना रस्त्याच्या कडेला चार ठिकाणी धोकादायक विहिरी असून, रस्त्यालगत असलेल्या विहिरीवर सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विहीर मालकांनी तातडीने संरक्षणासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत, नाशिक येथील दिंडोरी शहरात विहिरीत चार चाकी वाहन पडून, एकाच कुटुंबातील नऊ जणांना प्राण गमवावे लागले असल्याकारणाने, या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र वीर तालुका पुरंदर येथील रस्त्याची पाहणी केली असता, रस्त्याच्या साईड पट्टी लगत चार विहिरी धोकादायक परिस्थितीमध्ये आढळून आलेल्या आहेत, त्यामध्ये तीन विहिरी येथे असून, एक विहीर यादववाडी येथे आहे, वीरला जाताना नारळी बाग या ठिकाणी या विहिरी आहेत ,संबंधित शेतकऱ्यांनी या विहिरींना कठडे बांधणे गरजेचे आहे, या ठिकाणी कोणतेही प्रकारचे फलक नाहीत, विहिरीला संरक्षण कठडे अथवा धोका दर्शक फलक नाहीत, विहिरीच्या कडेने मोठी झुडपे असल्याकारणाने, विहिरीत कोणी पडले अथवा अपघात झाल्यास लवकर समजून येणार नाही, सगळ्या विहिरी पाण्याने काठोकाठ भरलेल्या आहेत, याबाबत वीर गावच्या सरपंच मंजुषा धुमाळ म्हणाल्या की, या विहिरी अत्यंत धोकादायक असून, तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र देऊन, या गोष्टी निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले आहे ,या रस्त्याची पहाणी करून याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला असून, उपाययोजना करण्यासाठी नियोजित आराखडा तयार करण्यात येणार आहे. प्रकाश निगडे उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुरंदर तालुका.

Post a Comment

0 Comments