सासवड येथील बैलगाडा स्पर्धेत अमितशेठ भाडळे यांचा देवा व छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा या बैलगाडीचा प्रथम क्रमांक. या बैलगाडीस एक 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.स्पर्धेत 230 बैलगाड्यांचा सहभाग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड येथे श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्ट व श्री भैरवनाथ चैत्री उत्सव व सासवडकर ग्रामस्थ यांच्यावतीने चैत्री उत्सवानिमित्त पाच एप्रिल रोजी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अमितशेठ भाडळे यांचा देवा व छत्रपती संभाजीनगरकरांचा देवा या बैलगाडीचा प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाच्या या बैलगाडीस एक 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेत 230 बैलगाड्यांचा सहभाग घेतला. तर विकासशेठ ठोंबरे उंबरगाव यांची रायफल आणी सुनील देसाई पालेगाव यांचा वादळ या बैलगाडीने द्वितीय क्रमांक पटकावला. या बैलगाडीस 1 लाख 11 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच तानाजीकाका झांबरे झांबरेवाडी यांचा राहुल्या आणी वडकी करांचा चॉकलेट या बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकावला. या बैलगाडीस 71 हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच हर्षल पायगुडे कुडजे यांचा रायफल आणी अमोल गायकवाड वडकी यांचा हरण्या या बैलगाडीने चतुर्थ क्रमांक तर ५ वा क्रमांक शौर्य दैवत गोवेकर लोणंद यांचा सुंदर व प्रेमशेठ जांभळे जांबुळवाडीकरांचा नंद्या आणि धीरज भांडवलकर सासवड यांचा बादल व राजे फार्म मुरूम कर्जतकरांचा शिवा या बैलगाडीने सहावा क्रमांक पटकाविला. या बैलगाडा स्पर्धेचे समालोचन सचिन जगताप यांनी केले. तर आभार बंडूकाका जगताप यांनी मानले.यावेळी स्पर्धेचे आयोजक श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश वामनराव जगताप उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव भोंगळे, गाव पाटील संग्राम भिकाजी पाटील, तसेच श्री भैरवनाथ चैत्री उत्सव कमिटीचे अध्यक्ष अजय गणपत जगताप, उपाध्यक्ष नितीन वसंतराव भोंगळे, सचिव विठ्ठल महादेव शिंदे तसेच ट्रस्ट व उत्सव मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे बैलगाडी स्पर्धेची ढाल वितरण करीत असताना स्पर्धक व पदाधिकारी.फोटो : सासवड ( ता. पुरंदर ) येथे बैलगाडा स्पर्धेत धावणाऱ्या बैलगाड्या.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments