पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेकडून एप्रिल महिन्यापासून दोन दिवसाआड होणार सासवडला पाणीपुरवठा सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: गराडे जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे आणि घोरवडी धरणातील 13% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिल्या या कारणामुळे सासवड ता. पुरंदर येथील शहराला सहा एप्रिल पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आव्हान सासवड नगरपालिकेने केलेले असून, गराडे जलाशयात केवळ 9 % पाणीसाठा उरल्याने, तेथील स्त्रोत बंद झालेला आहे, घोरवडी जलाशयातही 20% पाणीसाठा आहे, अशी माहिती लघु पाट बंधारे विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड व विश्वास पवार यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली. त्यामुळे सासवड करांना ऐन उन्हाळ्यामध्ये दोन दिवसाआड पाणीपुरवठा सासवड साठी होत असल्याची माहिती सासवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments