पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी भाजपचा स्थापना दिन उत्साहमध्ये; तर माजी आमदार संजय जगताप यांचे कार्यकर्त्यांना संघटन मजबुतीकरण करण्याचे आवाहन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: भारतीय जनता पक्षाचा 46 वा स्थापना दिन सासवड येथील पक्ष कार्यालयामध्ये उत्साह पूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार संजय चंदूकाका जगताप यांनी कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा ही तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भाजप ध्वजारोहणा ने करण्यात आली, यावेळी संजय जगताप यांनी आपल्या भाषणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून, भारतीय जनता पक्षापर्यंतच्या वैचारिक प्रवासाचा उल्लेख केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत असल्याची सांगण्यात आले, विकास कामाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा असे त्यांनी नमूद केले महाराष्ट्रातही भाजपच्या माध्यमातून विकासाची गती वाढत असल्याचेही सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामकाजाचा त्यांनी उल्लेख केला पक्षाचे कार्यकर्ते हेच पक्षाची खरी ताकद असून, समाजातील सर्व घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी संभाजी काळाणे, संजय निगडे, संदीप कटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विठ्ठल मोकाशी, हरिभाऊ लोंले, अजय इंगळे_ सायली शिंदे, सुनीता कोलते ,मनीषा गायकवाड, सुनील देशपांडे, अजित जगताप ,डॉक्टर मनोज शिंदे ,प्रदीप राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी व कार्यकर्ते आधी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या वेळी निरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे यांनी उपस्थित यांचे आभार मानले. स्थापनेच्या दिनानिमित्त कार्यकर्त्यांना पक्ष विस्ताराचा निर्धार हा व्यक्त करण्यात आला
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments