Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील शिक्षक पतसंस्थेतील सत्ता संघर्ष उफाळला; तर बैठकीतील वाद हा थेट पोलीस ठाण्यापर्यंत; अध्यक्षांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेतील सत्ता संघर्ष आणखी तीव्र होत असल्याचे चित्र दिसून आलेले आहे ,या वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, सासवड येथील शंकराव उरसळ सभागृहामध्ये झालेल्या बैठकीदरम्यान, पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तानाजी फडतरे यांनी पतसंस्थेच्या निवडणुकीचा राग मनात ठेवून, थेट धमकी दिल्याचा गंभीर आरोप उपसभापती गणपत मेमाणे यांनी केला आहे, याप्रकरणी मेमाणे यांनी सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे, तक्रारीनुसार यापूर्वीही राजीनामेसाठी दबाव टाकण्यात आल्याचे म्हटले आहे ,त्यामुळे हा वाद केवळ बैठकीपुरता मर्यादित नसून, पतसंस्थेच्या चेअरमन निवडी दरम्यान: निर्माण झालेल्या वर्चस्वाच्या मतभेदा मधूनच या संघर्षाला सुरुवात झाल्याची चर्चा आहे, चेअरमन पदी जितेंद्र कुंजीर यांची निवड झालेली चुरशीची आहे, आणि एका मताभोवती फिरणारे आरोप प्रत्यारोप यामुळे वातावरण आधीपासूनच तापले होते, विशेष म्हणजे हे मत नेमके कोणाचे? या प्रश्नावरून संशयाची सुई काही सत्ताधारी संचालकाकडे वळविल्याने, गटबाजी अधिकच तीव्र झाली आहे, एका मता भोवती फिरणारे आरोप- प्रत्यारोप यामुळे वातावरण आधीपासूनच तापलेले आहे, मागच्या दाराने प्रवेश केल्याची चर्चा पूर्वी शिक्षक समितीत मध्ये आरडाओरडा आणि वाद निर्माण करणारे तानाजी फडतरे यांनी शिक्षक संघात मागच्या दाराने प्रवेश केल्याची चर्चा जोर धरत आहे, संघाचे आजीव सभासद नसतानाही ते थेट अध्यक्षपदी विराजमान झालेले आहेत, विशेष म्हणजे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ हा केवळ दीड वर्षाचा निश्चित असताना देखील त्यांनी तब्बल तीन वर्ष हे पद भूषवलेले आहे ,त्यामुळे ही बाब सरळ सरळ बेकायदेशीर असल्याचा ठाम मत सभापती जितेंद्र कुंजीर व उपसभापती गणपत मेमाणे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राजीनाम्याची मागणी, दबावाचे आरोप, अंतर्गत संघर्ष संघटना नेतृत्वावरील अविश्वास आणि विरोधकाकडून मिळालेली मदत यामुळे संघटनातील तणाव आणखी तीव्र होत असल्याचे दिसत आहे.

Post a Comment

0 Comments