सासवड येवलेवाडी मार्गावर वाहतूक निर्बंध सकाळी साडेसात वाजल्यापासून आवश्यकतेनुसार बंद सासवड प्रतिनिधी :बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : सासवड ते येवलेवाडी दरम्यान सकल हिंदू समाज यांच्या वतीने हिंदू जन आकोश मोर्चा आयोजित करण्यात आल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष अशी नियोजन करण्यात आलेले आहे वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोगदेव घाट मार्गाने सासवड कडे जाणारा रस्ता सकाळी सात वाजल्यापासून आवश्यकतेनुसार तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे ,यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो, दरम्यान पर्यायी मार्ग म्हणून खडीमशीन चौक, उंड्री चौक, मंतरवाडी फाटा ,दिवे घाट सासवड हा मार्ग खुला ठेवण्यात आलेला आहे, वाहतूक शाखेकडून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याची वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याची तसेच शक्यतो ,गर्दीच्या वेळेत प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे ,पोलीस उपयुक्त वाहतूक शाखा पुणे शहर.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments