श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता ; तर संत तेल्या भुत्याची कावड सासवड मध्ये दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील यात्रेची जलाभिषेक आटोपून मानाची श्री संत तेल्या भुत्याची कावड सासवड मध्ये दाखल झाली, अवघड मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने पार करत कावडीने करा नदीच्या पाण्याने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला, यानंतर कावडीचे सासवडमध्ये जंगी असे स्वागत करण्यात आले, मंगळवारी दि. 7 रोजी सायंकाळी जेजुरी नाका येथून ,निघालेल्या मिरवणुकीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली होती, रात्री शिवालय मंदिरामध्ये कावडीचे पूजन करण्यात आले, या पायी यात्रेची सांगता शुक्रवारी दि. 17 रोजी महादेव मंदिरात भंडाऱ्याने होईल ,अशी माहिती शिवयोगी कैलास महाराज कावडे यांनी दिली.याप्रसंगी गावचे पाटील संग्राम जगताप, शिवशंभू कावड मंडळाचे अध्यक्ष संजय द. जगताप, उदयराज जगताप, विलास (तात्या )जगताप, मंगेश कावडे, गणेश कुदळे, सौरभ जगताप, अनिकेत( आबा) जगताप, अभिजीत शिवरकर, प्रवीण भोंडे, माऊली (तात्या) काळे, रवी (नाना) जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments