Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील माजी सरपंच यांची आजारपणाला कंटाळून आत्महत्या सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दीर्घ काळामध्ये आजाराला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना दुर्दैवी अशी घटना पुणे पंढरपूर महामार्गावरील बोरावके मळा परिसरामध्ये सोमवारी दि. 13 रोजी घडली या घटनेमुळे परिसरामधील हळहळ व्यक्त होत असून, शहाजी बापू जगताप राहणार कोथळे तालुका पुरंदर असे मृत व्यक्तीचे नाव आहे, मिळालेल्या माहितीनुसार सासवड पोलिसांनी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारामध्ये बोरावके मळा या परिसरातील एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती मिळवली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, पोलीस तपासा दरम्यान मृताच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये आजारपणाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे, घटनास्थळी एक सायकल आढळून आली, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील प्रक्रिया करण्यासाठी तो सासवड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे, त्याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन करीत आहेत, अशी माहिती सासवड पोलीस स्टेशन कडून प्रतिनिधीला देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments