Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी स्वच्छता महा अभियान सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महात्मा ज्योतिराव फुले यांच्या दिव शताब्दी जयंती वर्षाची अवचित्य साधून सासवड नगर परिषदेने शहरात व्यापक अशी स्वच्छता अभियान सुरू केलेले आहे, रविवारी सासवड सोनोरी मार्गावर राबवलेल्या पहिल्या मोहिमेत चार तासात 12 टन कचरा उचलून परिसर चकाचक करण्यात आला, आता प्रत्येक कंपनीच्या पहिल्या रविवारी शहरातील एका भागात अशी मोहीम राबवली जाणार असल्याची यावेळी सांगण्यात आले, या मोहिमेमध्ये माजी आमदार संजय जगताप, नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष श्रमदान केले. सासवडने स्वच्छतेचा वारसा जपत सलग सहा वर्ष देशात अव्वल क्रमांक पटकावलेला असल्याचे आरोग्य सभापती राजन जगताप यांनी यावेळी सांगितले, याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, नगरसेवक ज्ञानेश्वर जगताप, लीना वढणे, प्रदीप राऊत, ज्ञानेश्वर गिरमे, सासवड नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका आदी उपस्थित होते. नगरपालिकेचे 150 स्वच्छता दूत, 10 घंटा गाड्या 8 ट्रॅक्टर आणि 2 जेसीबीच्या सहाय्याने महामार्ग ते स्वामी समर्थ मठ परिसरातील कचरा हटवण्यात आला, सासवडने आजवर जे स्वच्छताच्या बाबतीत जे यश मिळवले आहे त्या मागे सासवडकर नागरिकांचे योगदान मोठे आहे, आणखी लोक सहभागातून वाढवत, प्रशासन नागरिक यांच्या सहयोगातून सासवड शहर स्वच्छतेच्या क्रमवारीमध्ये यापुढेही देशात अग्रस्थानी राहील. संजय जगताप माजी आमदार पुरंदर.

Post a Comment

0 Comments