पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेकडून थकीत मिळकत धारकाची अभय योजनेअंतर्गत शास्ती माफ; सासवड नगर परिषदेची 5 कोटी 70 लाखाची विक्रमी अशी वसुली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सन 2025 -26 या आर्थिक वर्षाकरिता सासवड नगर परिषदेमार्फत विशेष वसुली मोहीम राबवण्यात आली होती, थकीत मिळकत धारकावर मालमत्ता वर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 150 ते 156 अन्वये मालमत्ता सिल करणे, नळ कनेक्शन बंद करणे इत्यादी स्वरूपाची वसुली कामे कारवाई करण्यात आली ,सासवड नगर परिषदेतील सन 2025- 26 या आर्थिक वर्षाकरिता एकूण 5 कोटी 70 लाखाची वसुली करण्यात आली आहे, सासवड नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ता कराची प्रभावी अशी वसुली करण्यासाठी 100% शास्ती माफी करिता अभय योजना लागू करण्यात मान्यता देण्याबाबत दि. 30 मार्च रोजी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला होता, यानुसार सासवड नगरपरिषद क्षेत्रातील संपूर्ण थकीत मालमत्ता कराचा भरणा दि. 31 मार्च 2026 पर्यंत केलेल्या मिळकत धारकाची शासकीय माफी करण्यात आली. थकीत मिळकत धारकांचा अभय योजनेस मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला असून, थकीत करा वरील शासकीय माफ करण्यासाठी तब्बल 465 अर्ज सासवड नगरपरिषद कार्यालयात प्राप्त झाले असून, या थकित मिळकत धारकांच्या 65 लाख रुपयांचे शासकीय माफीचा थेट लाभ मिळाला राज्य शासनाने जाहीर केलेल्या 100% वसुली शास्ती माफी मुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलेली होती, सासवड नगरपरिषदेकडून नागरिकांच्या सोयीसाठी सुट्टीच्या दिवशी सुद्धा कर भरणा केंद्र सुरू ठेवण्यात आले होते, 31 मार्च रोजी मध्ये रात्रीपर्यंत नागरिक कर भरणा करण्यासाठी नगरपरिषद कार्यालयात उपस्थित होते, अभय योजनेमुळे नगरपरिषदेच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळाली असून ,थकीत कर वसुलीत यश मिळाल्याचे मुख्याधिकारी dr कैलास चव्हाण यांच्याकडून असेही सांगण्यात आले. नगराध्यक्ष आनंदी (काकी) चंदुकाका जगताप यांनी असे सांगितले की, कमी कालावधीमध्ये झालेली वसुली समाधानकारक आहे, विविध कारणामुळे कर भरू न शकलेल्या थकबाकीदारासाठी योजनेची मुदत वाढवून मिळावी तसेच उर्वरित थकीत मिळकत धारकांनी अभय योजनेविषयीच्या अधिक माहितीसाठी सासवड नगर परिषद कार्यालयाशी संपर्क करावा अशी माहिती नगराध्यक्ष आनंदी (काकी) जगताप यांनी सविस्तर ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments