Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील सासवड आगारांमध्ये स्वच्छतेचे एक प्रकारे कौतुक व मार्गदर्शन पर सदिच्छा भेट सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ अभियान अंतर्गत दि. 1 जानेवारी 2026 रोजी सासवड आगाराला प्रादेशिक अभियंता तसेच सांख्यिकी अधिकारी मिसळ नियंत्रण समिती क्रमांक पाच राव अमरावती प्रदेश यांनी यावेळी भेट दिली या भेटीच्या दरम्यान सासवड बस स्थानक परिसरातील स्वच्छता सुशोभित बगीचा तसेच बस स्थानकातील ठेवण्यात आलेल्या मोठ्या झाडांच्या कुंड्या याची पाहणी करण्यात आली परिसरातील स्वच्छता व प्रसन्न वातावरण पाहून अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत एक प्रकारे कर्मचाऱ्यांचे कौतुक केले तसेच बस स्थानकाच्या आणखी सुशोभीकरणासाठी आणि स्वच्छता व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी काही ठिकाणी योग्य अशा प्रकारचे नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन ही करण्यात आली या भेटीमुळे सासवड आगारातील स्वच्छता मोहिमेला अधिक बळ मिळणार असं प्रवाशासाठी स्वच्छ व सुखद असे वातावरण या ठिकाणी राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

0 Comments