Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील खानवडी या ठिकाणी प्रियकराकडून प्रेयसीचा खून; आत्याचारानंतर गळा दाबून हत्या केल्याचा आरोप; तर आरोपी विरोधात 18 सिटीसह गंभीर असे गुन्हे दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील माळशिरस येथील बावीस वर्षीय तरुणीचा निर्गुण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यामध्ये अत्याचार व अनु सुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये खळबळ उडाली आहे ,याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महेंद्र प्रल्हाद गायकवाड वय 50 राहणार माळशिरस ता. पुरंदर यांनी दिलेल्या तक्रारी वरून अनिकेत विष्णू जाधव वय 21 राहणार माळशिरस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा गुन्हा सासवड पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदविण्यात आलेला आहे, फिर्यादीच्या तक्रारीनुसार मृत तरुणी निलम गायकवाड वय 22 ही सासवड येथील वाघीरे महाविद्यालयात टी. वाय. बी .ए चे शिक्षण घेत होती, सुमारे तीन वर्षांपूर्वी तिचे आरोपी अनिकेत जाधव यांच्याशी फोनवरून बोलणे होत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यावेळी दोन्ही कुटुंबामध्ये चर्चा होऊन, संपर्क तोडण्याची आश्वासन देण्यात आले होते, दि. 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी निलम ही नेहमीप्रमाणे कॉलेजला गेली होती ,मात्र सायंकाळी घरी परतली नाही, कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही, रात्री उशिरा पोलिसांकडून फोन आल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालय सासवड येथे पोहोचले असता, निलमचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे समजले, मृतदेह पाहिल्यानंतर तिच्या शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा, गळा सुजलेला असल्याचे दिसून आले, फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत आरोपीने अत्याचार करून गळा दाबून खुन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे, ही घटना दि. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्यापूर्वी खानवडी गावच्या हद्दीत घडल्याचे नमूद करण्यात आलेले आहे, सदर प्रकरणात आरोपी अनिकेत जाधव याला पीडीतीची जात माहिती असूनही, त्याने तिच्याशी सबंध ठेवून नंतर अज्ञात कारणावरून हा गुन्हा केल्याचा आरोप आहे, तसेच आरोपीच्या कुटुंबियाकडून धमकीची शक्यता असल्याचेही फिर्यादीने नमूद केलेले आहे ,या गुन्ह्याचा तपास राजेंद्र सिह गौर उपविभागीय पोलीस अधिकारी भोर याच्या अधिपत्याखालील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम तपास करीत आहेत, या घटनेमुळे पुरंदर तालुक्यात एक प्रकारे संताप व्यक्त होत असून ,आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी सामान्य नागरिकाकडून व पुरंदर तालुक्यातून होत आहे.

Post a Comment

0 Comments