Hot Posts

6/recent/ticker-posts

एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालयात ‘NutriDEC’ केंद्राचे उत्साहात उद्घाटन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज : एस.एन.डी.टी. गृहविज्ञान महाविद्यालय, पुणे येथे सीन्यूट्रीशन अँड डायट एज्युकेशन सेंटर (NutriDEC)व चे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव व डॉ. राजेंद्र भारुड (भा.प्र.से.), प्रकल्प संचालक, राज्य प्रकल्प संचालनालय (SPD), महाराष्ट्र, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान (RUSA) यांच्या शुभहस्ते पार पडला.या प्रसंगी विद्यापीठातील प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.प्रा. उज्वला चक्रदेव यांनी NutriDEC संकल्पनेबाबत बोलताना सांगितले की, “एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ हे समाजापर्यंत पोषण व आहाराविषयी योग्य जागरूकता पोहोचवण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. या केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अनुभवाधारित शिक्षण मिळेल आणि समाजालाही थेट फायदा होईल.”डॉ. राजेंद्र भारुड यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना, “विद्यापीठाने आरोग्य व पोषण क्षेत्रातील हा अभिनव प्रयोग राबविल्याबद्दल कुलगुरू महोदया तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थिनींचे अभिनंदन. या माध्यमातून पोषण अभियानास निश्चितच चालना मिळेल,” असे मत व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश चव्हाण यांनी सांगितले की, NutriDEC हे केंद्र एकीकडे समाजासाठी पोषण सल्ला सेवा केंद्र तर दुसरीकडे क्लिनिकल ट्रेनिंग सेंटर म्हणून कार्य करणार आहे. येथे पदवी व पदव्युत्तर विद्यार्थिनींना डायट प्लॅनिंग, काउंसेलिंग आणि क्लिनिकल न्यूट्रिशन याविषयी प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार असून, स्थानिक समुदायालाही परवडणाऱ्या व पुराव्यावर आधारित आहार मार्गदर्शनाची सुविधा मिळणार आहे.या प्रसंगी ‘संस्कृता’ या ब्रँडअंतर्गत विद्यार्थिनी तयार करीत असलेल्या खाद्यपदार्थ व इतर उत्पादने याची माहिती पाहुण्यांना देण्यात आली. प्रा. चक्रदेव व डॉ. भारुड यांनी विद्यार्थिनींच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेले हे केंद्र कौशल्य विकास, संशोधन व समाजाभिमुख सेवा या तिन्ही बाबींमध्ये सेतू बांधून देईल. त्यामुळे शैक्षणिक व सामाजिक बंध अधिक दृढ होऊन ‘पोषण अभियान’च्या उद्दिष्टपूर्तीस हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments