Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर विमानतळासाठी जमीन मोजणी प्रक्रियेला आजपासून झाली सुरुवात; संमतीस मुदत वाढ नाही; तर कुंभारवळण येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी संमती दिली असून, विमानतळाला संमती दिलेली नाही सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे भरपूर प्रमाणामध्ये जमिनीच्या संपादनाची संमती शेतकऱ्यांनी दिली आहे. संमती पत्रे सादर करण्यासाठी दिलेली वाढीव मुदत गुरुवारी संपुष्टात आली असून, या मुदतीमध्ये विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्र 3000 एकर पैकी आज अखेर भरपूर प्रमाणामध्ये जागेची संमती पत्रे जिल्हा प्रशासनाकडे सादर झाली आहेत, त्यानंतरच शुक्रवारपासून दि. 26 जमीन मोजणी सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले. पुरंदर तालुक्यातील पारगाव, मुंजवडी, उदाचीवाडी, एखतपुर, खानवडी, वनपुरी, आणि कुंभारवळण या सात गावात विमानतळासाठी सुमारे 3000 एकर जमिनीचे संपादन करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संमती पत्र सादर करण्यासाठी 26 ऑगस्ट ते 18 सप्टेंबर पर्यंत ची मुदत देण्यात आली होती, या मुदतीमध्ये सुमारे भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपादनासाठी संमती आले नव्हते, संमती न दिल्याने, या शेतकऱ्यांना विकसित भूखंडाचा लाभ मिळणार नसल्याची स्पष्ट करण्यात आलेले होते, मात्र या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा यासाठी ही मुदत आणखी वाढवुन द्यावी, अशी मागणी केलेली होती ही मुदत वाढ गुरुवारपर्यंत दि. 25 पर्यंत वाढवलेली होती त्यानुसार भरपूर प्रमाणामध्ये जागेची संमतीपत्रे प्राप्त झालेली असून, आत्तापर्यंत भूसंपादनासाठी सहमती दर्शवलेली असताना, शेतकऱ्यांनी विमानतळासाठी संपादित करण्यात येणाऱ्या एकूण क्षेत्राच्या भरपूर प्रमाणामध्ये संमती पत्रे दिलेली असून, यानंतर संमतीपत्रे सादर करण्यासाठी कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले आहे, तर कुंभारवळण या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी एकत्रित होऊन, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांच्याशी संवाद साधून, फक्त आम्ही कुंभारवळण येथील शेतकरी जमीन मोजणीसाठी संमती देत असून, तर विमानतळासाठी आमची अजिबात संमती असणार नाही असे स्पष्ट केले असून, त्यामुळे दोन दिवस 24 व 25 रोजी भरपूर प्रमाणामध्ये कुंभार वळण येथील शेतकऱ्यांनी संमती दिली आहे, फक्त जमीन मोजणीसाठी तर विमानतळासाठी संमती दिलेली नाहीच, कारण विमानतळासाठी कुंभारवळण येथील बागायत क्षेत्र जवळजवळ शंभर टक्के आहे, त्यामुळे विमानतळासाठी जागा घेता येणार नाही, परंतु कुंभारवळण येथील काही एजंट हे त्या ठिकाणी विमानतळाच्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांच्याशी विमानतळाच्या संदर्भात जे लुडबुड, हितगुज चाललेले आहे हे धोकादायक असताना, शेतकऱ्यांना या एजंटला पूर्णपणे विमानतळाच्या संदर्भातून अधिकारी वर्गांनी बाजूला करावे, अन्यथा नाही तर त्या ठिकाणी वेगळा परिणाम होईल, याची काळजी ,स्वतः जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी व प्रांत मॅडम यांनी घ्यावी, मुजवडी, उदाचीवाडी, एखतपूर, खानवडी, वनपुरी आणि कुंभार वळण येथील गावांमधील जवळपास भरपूर प्रमाणामध्ये संमती पत्रे सादर झालेली असून, पारगाव येथील सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये जमिनीचे संमतीपत्रे आलेली आहेत, यादरम्यान संमिती पत्रे देण्याची मुदत वाढ संपल्यानंतर लगेचच आज शुक्रवारपासून दि. 26 जमिनीच्या मोजणीला प्रारंभ करण्यात येणार आहे, संमती पत्रे सादर करण्यासाठी दिलेली मुदतवाढ संपलेली आहे. या मुदतीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये संमतीपत्रे दाखल झालेली आहेत. संमती पत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. जितेंद्र डुडी जिल्हाधिकारी.

Post a Comment

0 Comments