Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड शहरात “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. १७ सप्टेंबर, २०२५ ते ०२ ऑक्टोबर, २०२५ दरम्यान स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा आयोजित करण्यात आला असून, या वर्षी "स्वच्छोत्सव" हे अभियान राबविण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता संपूर्ण सासवड शहरात आठ ठिकाणी “श्रमदान एक दिवस – एक तास – एक साथ” भव्य स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले .तरी सदर स्वच्छता मोहिमेमध्ये सर्व शहरातील नागरिक ,शाळा महाविद्यालये ,सामाजिक संस्था,महिला बचत गट यांनी सहभाग घेतला.स्वच्छता ही सेवा कार्यक्रमाची जनजागृती करण्यासठी स्वच्छता रांगोळी काढण्यात आली . स्वच्छता हि सेवा २०२५ अभियानाचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी, आणि जनजागृती म्हणून व्यवसायिक क्षेत्र तसेच रहिवाशी क्षेत्र,शहरातील अंतर्गत रस्ते पर्यटन स्थळे येथे स्वच्छता करण्यात आले.सासवड शहरातील साठेनगर,इंदिरानगर पुणे रोड,सोनोरी रोड सोपानकाका मंदिर परिसर,नाना नानी पार्क तारादत्त पूर्व रोड अश्या विविध ठिकाणी शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलाश चव्हाण, सासवड नगरपरिषदेचे स्वच्छतेचे brand ambassador मोहन चव्हाण, यांच्या माध्यमातून शहरातील विध्यार्थी तसेच नागरिकांना गुलाबाची फुले देऊन स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. सदर स्वच्छता कार्यक्रमात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सह अधिकारी/कर्मचारी तसेच शहरातील शाळा तसेच महाविद्यालय यांचे विध्यार्थी,शिक्षक,वज्रपुरंदर फौंडेशन,नगरपरिषद सेवानिवृत्ती कर्मचारी आदींनी उपस्थित राहून स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

Post a Comment

0 Comments