पुरंदर तालुक्यातील सासवड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी भारती शिवाजी जगताप (शिंदे) यांची बिनविरोध निवड ;तर सासवड बार असोशियन मध्ये महिलाराज सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील सासवड बार असोसिएशनची 2026 व 2027 मधील निवडणूक बिनविरोध पार पडली असून, असोसिएशनच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड करीत एक आदर्श पायडा पाडलेला आहे, यावेळी नवनिर्वाचित महिला पदाधिकाऱ्यांचा एक मुखाने निवड महिला राज म्हणून करण्यात आली ,मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी नितीन जाधव व सह निवडणूक निर्णय अधिकारी एडवोकेट मुन्ना उर्फ नाजनीन सिकंदर आतार यांची बिनविरोध निवडणुकीचा निकाल त्यांनी जाहीर केला. यावेळी अध्यक्ष एडवोकेट भारती शिवाजी जगताप (शिंदे) रा. कोथळे उपाध्यक्ष एडवोकेट गीतांजली शिवाजी मेमाणे (ढोणे )रा. भिवरी ,एडवोकेट सरला देविप्रसाद तिवारी रा. वाल्हे, सचिव एडवोकेट ललिता सचिन झेंडे (पोमण) रा. भिवडी सहसचिव एडवोकेट श्वेता विकास कुंजीर( फडतरे) रा. बोपगाव खजिनदार एडवोकेट सानिया साजिद मनियार रा. शिवरी ,हिशोब तपासणीस एडवोकेट करिष्मा सलीम डांगे रा.सासवड यांची बिनविरोध निवडी झाल्या असून, महिला राज बार सासवड असोशियन मध्ये झालेला आहे. यावेळी माजी अध्यक्ष ऍडव्होकेट चंदन मेमाणे, ऍडव्होकेट बाळासाहेब जगताप, एडवोकेट प्रवीण शेंडकर, एडवोकेट भास्कर जगदाळे, एडवोकेट कलाताई फडतरे, एडवोकेट विशाल पोमण, एडवोकेट सुमित पवार, एडवोकेट अनिकेत जगताप, एडवोकेट हर्षद लांघी एडवोकेट अक्षय नाजिरकर, एडवोकेट सुरज भोसले, एडवोकेट वैष्णवी माने, यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला ,नवनिर्वाचित कार्यकारिणींचा पदग्रहणाचा कार्यक्रम यावेळी पार पडला, यावेळी सर्व सभासद आदी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments