Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील रिसे या गावातील पाणी प्रश्न अखेर मार्गस्थ सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रिसे या गावांमधील मागील अनेक दिवसापासून सुरू असलेली पिण्याच्या पाण्याची समस्या ही मार्गी लावण्यामध्ये अखेर यश मिळाले असून ,रिसे गाव, खोपडेवाडी यांना पिण्याच्या पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीवर एकाने अतिक्रमण केल्याने, दहा दिवसापासून पुरवठा बंद झाला होता, ग्रामस्थांनी ही परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांच्यासमोर मांडल्यानंतर, त्यांनी पाणी अडवणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली, त्यांना प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत गट विकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात आली. प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या आदेशानुसार गट क्रमांक 255 मधील विहिरीचे अधिग्रहण करून, पाणीपुरवठा अखेर सुरळीत करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, ग्रामस्थांनी ही परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य अजय इंगळे यांच्यासमोर मांडली असताना, त्यावर अखेर त्या ठिकाणी अजय इंगळे यांच्या प्रयत्नांना जे यश मिळाले आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती स्वत: अजय इंगळे यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments