पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथे “प्रोफेशनल एटीकेट, ग्रुप डिस्कशन व मॉक इंटरव्ह्यू” या विषयावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: दि. ६ एप्रिल २०२६ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान दररोज सकाळी १०.३० वाजता पार पडला.या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिष्टाचार, प्रभावी संवादकौशल्य, गटचर्चा तंत्र आणि मुलाखत कौशल्य विकसित करणे हा होता. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी अजय मदाळे प्रशिक्षक, जीटीटी फाउंडेशन, पुणे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कौशल्यांचे महत्त्व पटवून दिले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य आणि योग्य व्यक्तिमत्त्व विकास याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान प्रत्यक्ष गटचर्चा (Group Discussion) व मॉक इंटरव्ह्यूचे प्रात्यक्षिक सत्र घेण्यात आले असून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला.या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून अंकिता जवळकर व डॉ. गणेश निगडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.महाविद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांनी या उपयुक्त प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments