Hot Posts

6/recent/ticker-posts

सासवड येथील वाघ डोंगर येथील पानवठा भरला सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवडचे माजी नगराध्यक्ष कै राजेंद्र उर्फ आर्यनभाऊ जगताप यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त वाघ डोंगर या ठिकाणी अमोल जगताप मित्र परिवाराच्या वतीने वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे पानवठे भरून दिले व धान्य उपलब्ध करुन दिले.हा कार्यक्रम गेली चार वर्षे उन्हाळ्यात सातत्याने सुरु आहे. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाजपा साकेत जगताप, माथाडी कामगार व युनियन तालुका अध्यक्ष अमोल जगताप, अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, कृष्णा फुलवरे तसेच वनरक्षक सचिन पाटील साहेब आरपीआय तालुकाध्यक्ष बळीराम सोनवणे, सासवड शहर सरचिटणीस प्रतीक म्हेञे, हिवरेचे पंचायत सदस्य शब्बीरभाई शेख, कोडीतचे सरपंच सुरज अवचरे, सामाजिक कार्यकर्ते कालिदास उबाळे, उद्योजक अमोल मोरे, शरद नेटके, विनायक जरांडे आदी उपस्थित होते. वाघ डोंगर परिसरात हरीण, ससे, मोर आदी लहान मोठे प्राणी आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या प्राण्यांना पाण्याची गरज असते ती आज भागले असल्याचे वनरक्षक सचिन पाटील त्यांनी सांगितले. फोटो : सासवड (ता. पुरंदर) येथील वाघ डोंगर येथे पानवठे पाण्याने भरून देत असताना शेजारी मान्यवर.

Post a Comment

0 Comments