प्रा. संदीप चंद्रकांत टिळेकर यांची रोटरी क्लब ऑफ पुरंदर अध्यक्षपदी निवड सासवड प्रतिनिधी : बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राचार्य प्रा. संदीप चंद्रकांत टिळेकर यांची रोटरी क्लब ऑफ पुरंदरच्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हनुमान भजनी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सचिन वढणे, बाळासाहेब जगताप, राजेंद्र लांडगे, तुकाराम गिरमे, अशोक भोंगळे, राजेंद्र भैरवकर, नितीन भोंगळे बाप्पू कामठे, शंकर हिवरकर, बाजीराव पाटील, दत्ता भोंगळे आदी उपस्थित होते. प्रा. टिळेकर हे गुरुकुल करिअर अकॅडमी, सासवडचे संस्थापक अध्यक्ष असून गेल्या २२ वर्षांपासून विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य सातत्याने करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर हजारो विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, कृषी, फार्मसी व शिक्षण क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत.ते श्री हनुमान भजनी मंडळ या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे सहसचिव तसेच महात्मा फुले सार्वजनिक ग्रंथालय, खानवडीचे सचिव म्हणूनही कार्यरत आहेत. सामाजिक उपक्रमांतर्गत दिवाळी पहाट,निबंध व वक्तृत्व स्पर्धा, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे.स्वर्गीय चंद्रकांत नातूजी टिळेकर शैक्षणिक व सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शिष्यवृत्ती मिळवून देणे तसेच सामान्य विद्यार्थ्यांना टॉपर्स बनविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे. शिस्त, संस्कार आणि शिक्षण या त्रिसूत्रीवर आधारित निवासी गुरुकुल पद्धती त्यांनी संत सोपानकाकांच्या भूमीत यशस्वीपणे राबवली आहे.त्यांच्या या निवडीबद्दल माजी आमदार संजयजी जगताप, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सागर नंदकुमार कुंडलिकआप्पा मेमाणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयदादा कोलते, डॉ. प्रवीण जगताप, प्रमोद धनवडे तसेच शिक्षण, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. सासवड येथे हनुमान भजनी मंडळाच्या वतीने संदीप टिळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे, सचिन वढणे, बाळासाहेब जगताप, राजेंद्र लांडगे, तुकाराम गिरमे, अशोक भोंगळे, राजेंद्र भैरवकर, नितीन भोंगळे बाप्पू कामठे, शंकर हिवरकर, बाजीराव पाटील व इतर.फोटो : प्रा. संदीप टिळेकर यांच्या निवडीचा सत्कार करीत असताना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष दत्ता भोंगळे व अण्णा क्षीरसागर शेजारी इतर.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments