Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील वीर येथे ' तू आमचे वाटोळे केले असे' म्हणत असताना महिलेला काठीने मारहाण करत; सासवड पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: 'तू आमचे वाटोळे केले आहेस असे' म्हणत असताना, एका महिलेला डोक्यात काठीने मारहाण करून, जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर सासवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, वीर ता. पुरंदर हद्दीमधील इंदिरानगर परिसरामध्ये मंगळवारी दि. 14 रोजी रात्री आठ ते बुधवारी दि. 15 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारामध्ये हा प्रकार घडला आहे, लीला दिनेश सावंत (वय 45) धंदा मंजुरी राहणार इंदिरानगर वीर ता. पुरंदर असे मारहाण करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताराबाई जालिंदर माळवे व जालिंदर रघुनाथ माळवे राहणार दोघेही इंदिरानगर वीर ता. पुरंदर यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी लिला सावंत या मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारामध्ये आपल्या घरी चुलीजवळ बसल्या होत्या, यावेळी त्यांच्या शेजारी राहणारी ताराबाई माळवे या फिर्यादीच्या घरासमोर आल्या' तू आमचे वाटोळे केले आहेस असे' म्हणत असशील शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली, वाद वाढत गेल्यानंतर आरोपी ताराबाई हिने आपल्या हातातील लाकडी काठीने लिला यांच्या डोक्यात उजव्या बाजूला जोराने प्रहार केला, यामध्ये लिला सावंत या जखमी झाल्या असून यावेळी लिला यांची बहीण सुनिता महेश शिंदे ही भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आली असता, आरोपींनी तिलाही मारहाण हाताने करून, शिवीगाळ व दमदाटी केली.दरम्यान; याप्रकरणी सासवड पोलिसांनी सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ताराबाई माळवे व जालिंदर माळवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, पुढील तपास पोलीस हवालदार विशाल जाधव करीत आहेत.

Post a Comment

0 Comments