Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील परिंचे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2026 शुक्रवार या दिवशी संपन्न होणार सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक मराअ- 2026 प्र. क्र. 09 समन्वय 1 दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजीचे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील क्षेत्रीय स्तरावर सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारीत सत्वर निकाली काढणे, महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मंडल स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्याकरिता निर्देश दिलेले आहेत, तरी पुरंदर तालुक्यामधील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे पहिला टप्पा शनिवारी दि. 7 मार्च 2026 रोजी कुंभारवळण व राजेवाडी यामंडला मधून वाघापूर या ठिकाणी संपन्न झाले, दुसरा टप्पा शनिवारी दि. 14 मार्च 2026 रोजी शिवरी व वाल्हे यामंडलामधून शिवरी या ठिकाणी संपन्न झाले, तिसरा टप्पा शुक्रवारी दि. 10 एप्रिल 2026 रोजी भिवडी या मंडला मधून नारायणपूर या ठिकाणी संपन्न झाले, चौथा टप्पा शुक्रवारी दि. 17 एप्रिल 2026 रोजी परिंचे मंडलांमधून परिंचे या ठिकाणी संपन्न होणार आहे, तर पुढील पाचवा टप्पा शुक्रवारी दि. 8 मे 2026 रोजी सासवड मंडलांमधून सासवड या ठिकाणी होणार आहे, तर सहावा टप्पा शुक्रवारी दि. 15 मे 2026 रोजी जेजुरी मंडलामधून जेजुरी या ठिकाणी संपन्न होणार आहे, तरी परिंचे मंडल भाग यांच्या कार्यक्षेत्रांमधून नागरिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान कार्यक्रम हा शुक्रवारी दि. 17 एप्रिल रोजी मोजे परिंचे येथील श्री काळ भैरवनाथ मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिराच्या अभियानांतर्गत शिबिरामध्ये देण्यात येणाऱ्या योजना व घटक पुढीलप्रमाणे अ) भोगवटादार वर्ग दोन जमिनी भोगवटादार वर्ग एक व जिवंत सातबारा सर्व गावांमधील सातबारा वाचन पूर्ण करून, ब)प्रलंबित वारस नोंदी करून, अधिकार अभिलेख अद्यावत करणे. क) सामाजिक अर्थसहाय्य योजना संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे शिबिरात लाभ देणे ड) तुकडेबंदी कायदा रद्द केल्यानुसार कार्यवाही प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरित गाव न्याय यादी करून असे व्यवहार नियमतीकरण करणे, ही शाळेतील मुलांना शैक्षणिक दाखले वाटप करणे मंडल स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले शैक्षणिक कामासाठी आवश्यक असणारे विविध दाखल्यांचे शाळेमध्ये कॉम्प्युटर मोड व विद्यार्थ्याकडून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून घेणे, शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करणे, पाणंद रस्त्याची दुरुस्ती करणे, उपविभागीय स्तरीय समितीचे दिनांक डिसेंबर 2025 नुसार शिबिर आयोजित करावयाच्या मंडळातील पाणंद रस्ते यांची प्रशासकीय मान्यतेचे आदेश ग्रामपंचायतला उपलब्ध करून देणे, सर्वासाठी घरे अंतर्गत पट्टे वाटप करणे, मंडळातील सर्वांसाठी घरी अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणे, तसेच संबंधित शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्व तयारीच्या कालावधीमध्ये प्रक्रिया पूर्ण करावी, व शिबिरातील पट्टे वाटप करावे, 2) समाधान शिबिरा अंतर्गत सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावयाच्या सेवा अप्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, विवाद ग्रस्त फेरफारांची संख्या निश्चित करून, संबंधितास आधीच नोटीस बजावून, शिबिराच्या दिवशी फेरफार निकाली काढण्यात यावेत, सबळ कारणाशिवाय फेरफार प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक व अभिलेख दुरुस्ती हेल्प डेस्क मंडल स्तरावर सातबारा मधील चुका संदर्भातील अर्ज स्वीकारणे, कागदपत्राची तपासणे त्रुटी व पूर्तता करून दुरुस्तीची नोंद घेणे. क) लोकसेवा हक्क कायदा, तात्काळ सेवा पुरवणे,उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी आदिवासी प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र इत्यादी बाबत अर्ज स्वीकारणे व प्रमाणपत्र वितरित करणे. ड) आकर्षक तरतुदी संदर्भातील सुधारणा बाबत मार्गदर्शन करणे, अकृषिक रूपांतरणासाठी नागरिकांना मार्गदर्शन करणे, जुन्या कृषीक आकारणी व रुपांतरण कराच्या व्यवस्थेऐवजी आता एक वेळेचे आधी मूल्य भरण्याची सोपी व्यवस्था करण्यात आली असून, इ डिजिटल सातबारा कायदेशीर वैधता बाबत जनजागृती करणे, शासन निर्णय याच्यानुसार अधिसूचना 10 डिसेंबर 2025 नुसार महाभुमी पोर्टल वरून, डिजिटल सातबारा डाऊनलोड करण्याची प्रात्यक्षिक देणे व नागरिकांना प्रोत्साहित करणे कमी-जास्त पत्रक तयार करणे, भूसंपादन केलेल्या व कृषी परवानगी दिलेल्या जमिनीचे कमी जास्त पत्रके तयार करून, गाव दप्तर अद्यावत करणे. इ सुधारणा व नागरी सुविधा एक खिडकीस व्यवस्था सिंगल विंडो कलर्स समाधान शिबिरामध्ये एक खिडकी प्रणाली राबवण्यासाठी एकाच खिडकीमध्ये सर्व प्रकारचे अर्ज स्वीकारणे, प्रक्रिया करणे व तात्काळ निकाली काढणे, शिबिरा दरम्यान; खालील नमूद इतर सेवा उपलब्ध करून देणे, ही मोजणी अग्रोस्टॅक, पी एम किसान योजना, तक्रार निवारण करणे यासाठी परिंचे मंडलातील ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडलाधिकारी बसवंत बनसोडे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments