पुरंदर तालुक्यातील सोनोरी श्री काळभैरवनाथ चैत्रि यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशा कुस्ती आखाड्यामध्ये शेवटची कुस्ती तब्बल 75 हजार व गदा सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सोनोरी ता. पुरंदर येथील श्री काळभैरवनाथ चैत्रि अष्टमी यात्रा उत्साह मध्ये संपन्न झाली. सोनोरी येथे श्री काळभैरवनाथ चैत्र अष्टमी यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य असे आयोजन करण्यात आले होते, यात्रेच्या पहिल्याच दिवशी श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी यांच्या मूर्तीला अभिषेक व विधिवत पूजा करण्यात आली, यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले ,यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या श्री काळभैरवनाथ कुस्ती आखाड्यामधील महाराष्ट्रातील अनेक नामांकित व अधिकच पैलवानांनी हजेरी लावली होती, सुमारे 250 मल्लांनी या आखड्यांमध्ये सहभाग घेतला होता, 3000 रुपयापासून ते 75 हजारापर्यंतच्या कुस्त्या रंगल्या ,महाराष्ट्र केसरी, पंजाब केसरी विविध मानांकित स्पर्धांमध्ये चमक दाखवलेल्या पैलवानांनी आपली ताकद आजमावली, माजी सरपंच बाळासाहेब( नाना) काळे यांच्या कुटुंबीयांच्या वतीने अंतिम कुस्तीसाठी 75 हजार रुपयांची चांदीची गदा देण्यात आली ,ज्यामुळे या कुस्तीचा उत्साह अधिकच वाढला असून, समस्त सोनोरी ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती आखाड्याची उत्कृष्ट असे नियोजन करण्यात आले होते, यावेळी आजी- माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य व गावातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते .यात्रेमुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साह आणि भक्तीमय वातावरणामध्ये ही परिसर पाहायला मिळाला.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments