Hot Posts

6/recent/ticker-posts

चुकीची माहिती प्रसारित केल्याप्रकरणी पुरंदरचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी निलंबित; खानवडी शाळेतील गैरवर्तन प्रकरण आदेशातील अटींचा भंग केल्यास सशस्त्र भंगाची कारवाई पुणे प्रतिनिधी: पुरंदर तालुक्यातील खानवडी मधील ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळा प्रकरणातील गैरवर्तन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याचा ठपका ठेवत व जिल्हा परिषद प्रशासनाने विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणीतील गोविंद हरिभाऊ लाखे यांना निलंबित केले आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी यासंदर्भातील आदेश जारी केलेले असून, महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम 1964 मधील नियम 3(1) अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे ,संबंधित अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिल्यानंतर, चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली तसेच माध्यमांमध्ये प्रसिद्ध केल्यामुळे, जिल्हा परिषद संस्थेची बदनामी झाल्याचे, प्रशासनाच्या निदर्शनास आले असून, निलंबन कालावधीमध्ये लाखे यांचे मुख्यालय पंचायत समिती वेल्हा येथे निश्चित केले आहे, गटशिक्षण अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय, त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, तसेच निलंबन काळामध्ये कोणताही खाजगी व्यावसायिक किंवा नोकरी करण्यास त्यांना सक्त मनाई केली आहे, दरम्यान शासनाच्या नियमानुसार निलंबन काळामध्ये त्यांना निर्वाह भत्ता देण्यात येणार असून, आदेशातील अटींचा भंग केल्यास, पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे, यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली असताना यात प्रवेश क्षमता 260 असून, ज्युनिअर केजी पासून बारावीपर्यंत सीबीएसई मंडळ संलग्नित ही शाळा आहे, या शाळेला राज्य शासनाचे मान्यता असून, सीबीएसई बोर्डाकडून मान्यतेची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे, या शाळेतील सर्व प्रवेश पारदर्शक पद्धतीने झालेल्या असून, स्थानिक नागरिकांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आले आहेत, याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात एक सीबीएसई शाळा सुरू करण्यास प्रशासनाने तयारी केल्याची माहिती मुख्यकार्यकारी धिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments