Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील गराडे परिसरामध्ये जमिनीच्या वादा मधून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी; सासवड पोलीस स्टेशन या ठिकाणी महिला सह एकूण वीस जणाविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्यातील गराडे ढोणेवाडी येथील हद्दीतील जमिनीच्या हक्कावरून आणि कंपाऊंडच्या कामावरून दोन कुटुंबात जोरदार राडा रोड झाला या हाणामारी मध्ये दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले असून ,सासवड पोलिसांनी महिला सह एकूण वीस जणांविरुध्द सासवड पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल केलेले आहेत, ही घटना 14 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारामध्ये घडली असून, याप्रकरणी दोन्ही बाजूकडून परस्पर विरोधी तक्रारी देण्यात आलेल्या आहेत, पहिल्या घटनेमध्ये फिर्यादी समीर गोकुळ ढोणे( वय 38) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी हे घराच्या पूर्व बाजूला असलेल्या जमिनीमध्ये आईसोबत कंपाऊंडचे काम करीत होते, यावेळी आरोपी प्रदीप दिनकर ढोणे, दिपक महादेव ढोणे, दिनकर द्वारका ढोणे, शंकर द्वारका ढोणे, अनिता संतोष ढोणे, रूपाली प्रदीप ढोणे, उत्कर्ष संतोष ढोणे सर्व राहणार गराडे तालुका पुरंदर यांनी ही जागा आमची आहे, असे म्हणत वाद घातला आरोपींनी पाण्याचे पाईप आणि कंपाउंड ची जाळी तोडली, तसेच समीर यांना लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी काठीने मारहाण केली, यादरम्यान; कोणीतरी एकाने समीर याच्या डोक्यात दगडाने मारहाण करून त्यांना जखमी केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे, त्यानुसार वरील सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, दुसऱ्या घटनेमध्ये रूपाली प्रदीप ढोणे (वय 35) यांनी फिर्यादी आहे की, त्यांच्या तक्रारीनुसार गट नंबर 2131 मध्ये आरोपी विनोद गोकुळ ढोणे, समीर गोकुळ ढोणे, सुंदराबाई गोकुळ ढोणे, सुप्रिया विनोद ढोणे, रेश्मा समीर ढोणे सर्व राहणार गराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे रत्‍नाबाई मारुती ढोणे, राजेंद्र वसंत ढोणे, गुनाबाई वसंत ढोणे, सुभाष संजय ढोणे, वसंत भैरु ढोणे, गीतांजली विजय ढोणे, विजय मारुती ढोणे, शेडच्या कामाबद्दल विचारांना केली असता, आरोपींनी शिवीगाळ करत रूपाली यांच्या दिरांना दीपक ढोणे यांनी मारहाण केली, दरम्यान; मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या विनोद ढोणे याने काठीने दीपक याच्या पाठीवर, छातीवर आणि डोक्यात गंभीर मारहाण केली तसेच "पुन्हा जमिनीत याल तर जिवे मारून टाकू," अशी धमकी दिली. याप्रकरणी सासवड पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस नुसार खालील कलमान्वये गुन्हे नोंद केलेली आहेत, या दोन्ही प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार विनायक हाके करत आहेत.

Post a Comment

0 Comments