Hot Posts

6/recent/ticker-posts

12 जुलै रोजी सासवड यैथून श्री संत योगीराज चांगावटेश्वर पालखीचे प्रस्थान सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री संत योगीराज चांगावटेश्वर देवस्थान क्षेत्र सासवड (ता. पुरंदर) जि. पुणे येथून आषाढीवारीसाठी 12 जुलै 2026 रोजी लक्ष्मी नारायण मंदीर येथून दुपारी 12 वाजता क्षेत्र पंढरपूरसाठी आषाढवारीसाठी प्रस्थान ठेवत आहे. परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एकादशीला सासवडला मुक्कामी येतो, द्वादशीला प्रथम श्री संत सोपानकाका पंढरपूरला आषाठीवारीसाठी प्रथम प्रस्थान ठेवतात. त्यांच्या पाठोपाठ लगेचच श्री संत योगीराज चांगावटेश्वर महाराजांची पालखी सोहळा पंढरपूरच्या आषाठी वारीसाठी प्रस्थान ठेवल्यानंतर कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी मार्गे सोहळ्याचा पहिला मुक्काम पारगाव मेमाणे याठिकाणी असतो. दि 13 जुलै रोजी वाघापूर चौफुला, वाघापूर, शिंदावणे घाटामधून अवघड उताराची वळणे घेवून शिंदावणे मार्गे विठ्ठल बन, डाळिंब मार्गे बोरीऐंदी मध्ये मुक्कामी असेल,दि 14 जुलै रोजी बोरीभडक ITI मार्गे पुणे सोलापूर रोडने सहजपूर मध्ये दुपारचा नैवद्य घेवून यवत गावामध्ये मुक्कामी असेल. दि 15 जुलै सकाळी भांडगाव, चौफुला, वरवंड कसबे पाटस भैरवनाथ मंदिरात मुक्काम. दि16 जुलैला MIDC, दत्तमंदिर, कुरकुंभ, मळद करून श्रींच्या पालखीला रावणगाव येथे अश्वाचे पहिले गोल रिंगण होईल व नंतर सोहळा मारुती मंदिरात मुक्कामी विसावेल, दिनांक 17 जुलैला खडकी काळभोर वस्ती, भिगवण मुक्काम, 18-जुलै तक्रारवाडी,पोंधवडी,कळस पाटी डाळज नंबर एक लाख मुक्काम, दिनांक 19 जुलैला डाळज नं.३ पळसदेव, लोणी देवकर, इंदापूर मुक्काम, दिनांक 20 जुलैला वडापुरी वकील वस्ती,निरा नदी मध्ये श्रींचे गंगास्नान करून अकलूज मुक्काम, दिनांक 21जुलैला कुलकर्णीवस्ती झगडेवस्ती, खंडाळी वेळापूर, तोंडले मुक्कामी. 22 जुलैला भंडीशेगांव मुक्काम, 23 जुलैला बाजीराव विहीर येथे श्रींच्या पालखीला अश्वाचे दुसरे गोल रिंगण होवून संतनगर वाखरी पालखी तळावर विसावेल. 24 जुलै दुपारी सर्व संताची देवभेट होईल व अश्वाचे उभे रिंगण होवून पुढरपूर मुक्कामी विसावेल.25 जुलैला देवशयनी एकादशी 29 जुलैला गोपाळकाला करून देवभेट करून सोहळा सासवडकडे परतीचा प्रवासस दुपारी १२ वाजता प्रस्थान ठेवेल. बोंडले, पिठेवाडी, लासुर्णे, बारामती, मोरगाव, खळद, व 4 ऑगस्ट रोजी लक्ष्मी नारायण मंदिरात आषाढी वारी करून सांगता होईल. अशी माहिती संस्थानचे व सोहळ्याचे चोपदार शशिकांत जगताप तसेच अध्यक्ष हभप जनार्धन वाबळे यांनी दिली. या वर्षी सोहळ्याच्या रथ ओढण्याच्या बैलजोडी साठी इच्छूक बैलमालकांनी संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments