पै. महेंद्र गायकवाड श्री भैरवनाथ जोगेश्वरी चा मानकरी राजुरी ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्साहात; आखाड्यात 350 मल्लांचा सहभाग सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: राजुरी ता.पुरंदर येथील श्री भैरवनाथ जोगेश्वरी ची यात्रा आयोजित भव्य कुस्ती आखाड्यामध्ये पै. महेंद्र गायकवाड उप महाराष्ट्र केसरी सोलापूर येथील असून, पै. गौरव शर्मा इंदोर (मध्य प्रदेश केसरी) यांच्यात कुस्ती होऊन, पै.महेंद्र गायकवाड यांनी घुटण्यावर डाव टाकून, पै. गौरव शर्मा यांच्यावर मात करून कुस्ती चितपट करत, श्री भैरवनाथ जोगेश्वरी चा किताब पटकावला याबद्दल ही कुस्ती 5 लाख 81 हजार रुपयाचा इनाम शेवटचा कुस्तीला ठेवण्यात आला होता, राजुरी ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केसरी कुस्ती स्पर्धेसाठी 350 पैलवानांनी हजेरी लावली होती, तर या आखाड्यामध्ये कुस्त्या या 180 पार पडल्या असून ,आखाड्याचे पूजन कृष्णाजी भगत माजी सरपंच (उद्योगपती) व हरिभाऊ भगत श्री भैरवनाथ उद्योग समूह (उद्योगपती) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अंकुश (बापू) भगत, उद्धव भगत, शाम भगत ,महेश भगत ,योगेश भगत, प्रमोद भगत, विजय भगत, संपत भगत, मनोहर भगत, संतोष भगत, संपत चोरघडे, सुधाकर भगत, कैलास भगत ,बाबुराव गायकवाड,राहुल गायकवाड, मनोहर उगले, विपुल भगत, सचिन मुळीक, पंचक्रोशीतील नागरिक, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध कार्य सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तंटामुक्ती अध्यक्ष ,आजी ,माजी, पदाधिकारी, यात्रा कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, नियामक मंडळ, गावातील शेतकरी बांधव ,युवक पिढी, शेतकरी ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते. माजी सरपंच कृष्णाजी भगत व हरिभाऊ भगत (उद्योगपती) यांच्या हस्ते 5 लाख 81 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले ,पंच म्हणून सागर चव्हाण, संभाजी चव्हाण, संजय बोरकर, वासुदेव (अण्णा) बनकर, आप्पा भांडवलकर, महादेव भगत, दिलीप शिवरकर यांनी उत्कृष्ट पद्धतीने पंच म्हणून काम केले. राजुरी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच व विद्यमान सरपंच कडून दोन लाख 50 हजार रुपयाचा इनाम होता, तिसरी कुस्तीसाठी दोन लाख 11 हजार रुपयाचा, चौथ्या कुस्तीसाठी एक लाख 75 हजार रुपयाचा, पाचवी एक लाख, सहावी 90 हजार, सातवी 80 हजार, आठवी 70 हजार नववी व दहावी 50 हजार रुपयापर्यंत कुस्त्यांच्या चितपट करूनच कुस्त्या या राजुरी या ठिकाणी जिंकण्यात आल्या होत्या. ही तर राजुरी करांची सर्वात श्रेष्ठ कुस्ती आखाडा पुरंदर तालुक्यातील राजुरी गावासारखा आत्तापर्यंत कुस्ती आखाडा हा एवढा दिव्य असा झालेला नाही ,त्यामुळे राजुरीचे पूर्ण देशात व परदेशांमध्ये नावलौकिक झालेले आहे, ही एक राजुरी करांची खासियत आहे, हा आखाडा सायंकाळी चार वाजता ते रात्री साडेबारापर्यंत चालला होता, स्पर्धेसाठी 350 पहिलवानांनी सहभाग नोंदवला होता ,या लढती पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी राजुरी येथे तुफान अशी गर्दी केली होती, पुणे जिल्ह्यातील (खोर ता. दौंड )येथील प्रसिद्ध कुस्ती निवेदक प्रा. सागर चौधरी व अनिकेत कदम यांनी समालोचन केले होते, या कुस्तीसाठी आखाड्यासाठी सुद्धा पत्रकार बहुसंख्येने आधी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments