Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यातील रिसे या गावातील पाणी प्रश्न पेटला असताना ;या संघर्षाला वाचा फोडताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी रिसे येथील विहीर अधिग्रहण केली सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: रिसे ता. पुरंदर येथील अंतर्गत येणाऱ्या सर्व वाड्या वस्त्यावरती पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली होती ,त्या अनुषंगाने शासनाची 40 वर्षापासून पिण्याच्या पाण्याची पाणीपुरवठा करणारी विहिरीचा पाणीपुरवठा संबंधित शेतकरी तुकाराम अंकुश भालेराव यांनी पाणीपुरवठा बंद केला होता, तरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्यात यावी, तरी गट नंबर 255 मधील विहीर अधिग्रहण करून, गावासाठी पिण्याचे पाणी सुरळीत करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक ग्रामपंचायत रिसे ता. पुरंदर येथील यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांना दि. 27 मार्च रोजी पत्राद्वारे कळविण्यात आले होते, क्रमांक तीन अन्वये गट विकास अधिकारी पंचायत समिती पुरंदर यांच्याकडून दि. 27 मार्चच्या पत्रानवे खाली नमूद केलेली विहीर अधिग्रहण करून, मिळण्याबाबत वरील क्रमांक चार अन्वये तहसीलदार कार्यालय पुरंदर यांच्याकडील पत्रानुसार दि. 27 मार्च रोजी या कार्यालयास कळवले होते, त्या अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील मौजे रिसे येथील आपत्कालीन परिस्थितीमध्ये गावाला पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर अधिग्रहण करण्याची आवश्यकता असलेले मौजे रिसे गावातील खालील प्रमाणे गट नंबर मधील विहीर खाली नमूद केलेल्या अटीनुसार पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहण करण्यात येत असून, अनुक्रमांक गावाचे नाव रिसे गट नंबर 255 सर्व पुराव्याच्या आधारे उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, अजय इंगळे जि. प सदस्य बेलसर माळशिरस गटातील,मंडल अधिकारी संजय बडधे, तलाठी सागर कुचेकर ,ग्रामसेविका नीलिमा चांदगुडे, गावातील माजी सरपंच, माजी उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील ,प्रशासक सरपंच, उपसरपंच, गावातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बांधव ,महिला मंडळ आदी उपस्थित होते, याबाबतची सविस्तर माहिती अशी की रिसे या गावातील पेटलेला पाण्याचा प्रश्न अखेर त्या ठिकाणची विहीर अधिग्रहण करून, त्या ठिकाणी एक प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना पाण्याच्या संदर्भात न्याय मिळवून दिलेला आहे, अशी सर्व माहिती उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे यांनी ही सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments