पुरंदर तालुक्यातील नायगाव येथील श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची बुधवारपासून यात्रेला सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील नायगाव येथील नवसाला पावणारे व जागृत देवस्थान असलेले श्री सिद्धेश्वर महाराज व माता जोगेश्वरी यांची यात्रा बुधवारपासून दिनांक सुरू होत आहे, त्यानिमित्त बुधवार दिनांक एक रोजी सायंकाळी सात वाजता श्रीचा हळदी समारंभाचा कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी दिनांक दोन रोजी पहाटे पाच वाजता हरिभक्त परायण बापू महाराज टेंगले (राहू) यांचे हनुमंत जयंती निमित्त किर्तन होणार आहे ,सकाळी सहा वाजून 33 मिनिटांनी हनुमान जन्म होईल, सात वाजता स्त्रीचे महाआरती होईल, त्यानंतर साडेसात वाजता ते अकरा वाजता दरम्यान; स्त्रीच्या पालखीचे ग्राम प्रदक्षिणा होईल, बारा ते चार वाजता भक्ताचे नवसाचे दंडवाटाचे कार्यक्रम होतील, सायंकाळी सहा ते साडेसात वाजताच्या दरम्यान सासवड, पेरणे, एलकेभादे, पारगाव, सिंगापूर, एखतपुर, मुंजवडी, नावरे, भोंडवेवाडी, कोथळे इत्यादी मानाच्या कावडीचे स्वागताचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता श्रीची महारती होईल, त्यानंतर सात वाजून 45 वाजता काट्यांचे स्त्रीच्या शिखराला लावण्याचा कार्यक्रम होईल, त्यानंतर साडेआठ ते दहा वाजताच्या दरम्यान अन्नपूर्णा ट्रस्ट माळवदकर बंधू यांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम होईल, रात्री दहा ते तीन वाजेपर्यंत स्त्रीच्या पालखी मिरवणूक व छबिण्याचा कार्यक्रम होणार आहे, शुक्रवार दिनांक तीन रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेमध्ये निलेश कुमार अहिरेकर सह रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे, चार वाजता ते सात पर्यंत या वेळेमध्ये कुस्त्यांचा जंगी आखाडा होईल, रात्री नऊ वाजता नंतर निलेश कुमार अहिरेकर सह रूपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती प्रशासक सरपंच यांनी ही माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments