Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर तालुक्यात भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस आज महावीर जयंती सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथे आज भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक दिवस महावीर जयंती सकाळी आठ वाजता ध्वजारोहण व आरती श्री 1008 अजिनाथ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर साईनाथ हाऊसिंग सोसायटी पारगाव सासवड रोड येथे होणार आहे, पंचकल्याणक पूजा महिला मंडळ यांच्या वतीने श्री कथूननाथ जैन मंदिर सासवड या ठिकाणी आठ वाजून पंधरा वाजता संपन्न होणार आहे ,नऊ ते 11 मिरवणूक भारत मेडिकल, अमर चौक, राजेंद्र भवन जगताप, हॉस्पिटल, ताथवडकर घर ,मोहिनी हॉटेल, जयप्रकाश चौक ,सरळ मेन रोड अमर चौक, मारुती मंदिर चौक, उजवीकडून नामदेव मंदिर हॉल येथे पूर्ण होणार आहे .स्वागत व नवकार मंत्र बहुमान भाषणे आरती व मंगल देवो होणार आहेत, साडेअकरा ते एक पर्यंत ,तर नंतर आलेल्या पाहुण्यांना दुपारी भोजनाचा कार्यक्रम हा दुपारी एक ते तीन या वेळेत होणार आहे, यासाठी कपिल ओसवाल, बाबू शेठ सोळंकी, गिरीश कर्नावट, धनपाल पाटील, मुन्ना सोलंकी, अशोक ओसवाल, सुरेखा पालवे ,अनिता चोभे, अर्चना प्रभूकर शोभा शिंगारे ,जया जितेंद्र तर पूजेचा लाभ हेमलाता रमेश ओसवाल यांना मिळाला आहे अशी सविस्तर माहिती संयोजक सकल जैन समाज त्यांनी सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments