Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरंदर मधील कावडी कडून मुंगी घाट सर; तर श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे महादेवाला करेच्या पाण्याने जलाभिषेक सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: श्री शेत्र शिखर शिंगणापूर जिल्हा सातारा येथे प्रथम मानाच्या खळद, खानवडी, एखतपुर, मुंजवडी ,कुंभारवळण या पंचक्रोशीच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीने तेल्या भुत्याच्या वंशज कावडीचे मानकरी शिवयोगी संत भुतोजी नाना महाराज खळदकर यांच्या मार्गदर्शनाखाली 'हर हर महादेवचा' जयघोष करत भक्ती आणि शक्तीच्या जोरावर अवघड असा मुंगी घाट मानवी साखळीच्या साह्याने सर केला, असून येथील स्वयंभू शंभू महादेवाला करेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला, श्री शेत्र एखतपुर ता. पुरंदर येथील भुतोजी बुवा तेली यांच्या जळत्या घराची जागा व तेलाचा घाणा येथे प्रदक्षिणा घालून, समाधीचे दर्शन घेऊन खळद येथून शाही मिरवणुकीने राम नवमीला दि. 26 रोजी पायी निघालेल्या कावड 16 कोळविहीरे जोगवडी, मूर्टी ,वडगाव निंबाळकर, जिंती, फलटण, निंबाळकर नाका असा प्रवास करत द्वादशी सोमवारी दि. 30 रोजी पहाटे रणखिला येथून सकाळी कोथळे येथे पोहोचला येथे प्रशासनाच्या वतीने तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या वतीने कावडीचे स्वागत करण्यात आले, तर नानासाहेब तेली महाराज इस्लामपूर यांच्या कावडीची भेट तसेच लहान मोठ्या काठ्या, कावडी यांची भेट होऊन दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी कावडीचे मुंगी घाटाकडे प्रस्थान झाले, चार वाजून 45 वाजता घाट पायथ्याशी पुरंदर हवेलीचे माजी आमदार संजय जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून कावडीचे स्वागत केले, त्यानंतर महाआरती होऊन पाच वाजून १५ मिनिटांनी कावडीच्या घाट चढण्यास प्रारंभ झाला ,नाना महाराज खळदकर व मागे ढोल ताशाच्या गजरामध्ये सनईच्या निनादांमध्ये मानवी साखळीच्या साह्याने 'हर हर महादेव चा जयघोष' करत एक एक टप्पा पार करत घाटाची चढण करणारा कावडीचा सोहळा मनोहारी दिसत होता, हा नेत्र दीपक सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी लाखो भाविकांनी गाठ माथ्यावर गर्दी केलेली होती, गाठ माथ्यावर उपविभागीय महसूल अधिकारी उज्वला गाडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, तहसीलदार विकास अहिर आदींनी कावडीचे स्वागत केले. पुढे कावड प्रथम अमृतेश्वर मंदिर व नंतर मुख्य मंदिरात नेहून श्री ना करा जलाचा जलाभिषेक केला, येथे शंभू महादेव देवस्थान समस्त शिखर शिंगणापूर बडवे मंडळी यांच्याकडून कावडीची पूजा करीत मानाचा ध्वज दिला. भक्ती -शक्तीचा अनोखा संगम मुंगी घाट भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम असून, चार दिवस रखरखत्या उन्हात प्रवास करून, आल्यावर मुंगी घाटाला सुरुवात करतात, वातावरणात बदल होऊन आभाळ झाकोळले जाते व गार वाऱ्याची झुळूक सुरू होते व भाविक भक्तिभावाने हा घाट लिलया पार करतात, असे प्रथम मानाच्या श्री संत तेल्या भुत्याच्या कावडीचे मानकरी शिवयोगी नाना महाराज खळदकर यांनी हे सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली.

Post a Comment

0 Comments