पुरंदर तालुक्यातील सुपे खुर्द येथे साई मच्छीमार सहकारी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सुपे खुर्द (ता. पुरंदर, जि. पुणे):येथील घोरवडी जलाशयावर कार्यरत असलेल्या साई मच्छीमार सहकारी संस्थेच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत आहेत. संस्थेची स्थापना सर्व सदस्यांना न्याय्य पद्धतीने रोजगार व उत्पन्न मिळवून देण्यासाठी करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात संस्थेचे अध्यक्ष व त्यांच्या कुटुंबीयांकडून वैयक्तिक स्वार्थासाठी संस्थेचा वापर केला जात असल्याचा आरोप सदस्यांकडून करण्यात येत आहे. संस्थेतील अध्यक्ष यांचे भाऊ सुमित कैलास जगताप हे बाहेरील राज्यातील व तालुक्यातील सराईत रात्रीचे चोरीने मासे पकडून घेऊन जात आहेत व विचारणा केली असता त्यांना ते सदस्यांना दमदाटी करत आहेत संस्था सुरू होऊन सुमारे दोन वर्षे पूर्ण झाली असली तरी एकाही सदस्याला मासेमारीचा लाभ देण्यात आलेला नाही. तसेच संस्थेतील बहुतांश सदस्य हे मूळ मच्छीमार नसल्याचेही समोर येत आहे.दरम्यान, घोरवडी जलाशय परिसरात संस्थेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून, त्याद्वारे सार्वजनिक तसेच खाजगी व्यक्तींचे चित्रीकरण केले जात असल्याची तक्रार आहे. याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी किंवा ठराव नसल्याचेही सांगितले जात आहे.तसेच संस्थेच्या बैठका नियमित घेतल्या जात नसून, सदस्यांना त्याबाबत कोणतीही सूचना दिली जात नाही. काही सदस्यांच्या सह्या बनावट पद्धतीने करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.या सर्व प्रकारामुळे संस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांकडून होत आहे.संस्थेच्या उपविधीनुसार अध्यक्ष, व सभासद हे संबंधित तलाव क्षेत्राच्या दहा किलोमीटर परिसरातील असणे आवश्यक आहे. हा नियम स्थानिक मच्छीमारांना प्राधान्य देण्यासाठी व संस्थेचा कारभार पारदर्शक ठेवण्यासाठी आहे.परंतु सदर संस्थेचे अध्यक्ष यांनी या नियमांचे स्पष्ट उल्लंघन करत तालुक्याबाहेरील एका व्यक्तीची सचिव पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती संस्थेच्या / उपविधींच्या विरोधात असून पूर्णतः बेकायदेशीर आहे. हे उघडकीस आणून दिल्या कारणाने अध्यक्ष यांनी सचिव यांचा राजीनामा मागून घेतला आहे या प्रकारामुळे स्थानिक सदस्यांच्या हक्कांवर गदा येत असून संस्थेचा कारभार काही मोजक्या लोकांच्या स्वार्थासाठी चालवला जात असल्याची शंका निर्माण होते. संस्थेत सुमित कैलास जगताप व कैलास वसंत जगताप हे सदस्य किंवा संस्थेचा कोणताही भाग नसताना दखल घेतात व अध्यक्ष यांचा नावाखाली रात्रीचा वेळी मासे चोरी करतात अशी तक्रार संस्थेचे सदस्य यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती प्रतिनिधीला दिली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments