पुरंदर तालुक्यातील सासवड नगर परिषदेचे पाण्याच्या संदर्भात काटेकोरपणे नियोजन सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवड ता. पुरंदर येथील शहराचा पाणीपुरवठा सध्या सुरळीत सुरू असून, यापुढेही नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सासवड नगरपरिषद प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन चालू आहेच, वीर आणि घोरवडी योजनेतून सध्या शहराला दररोज एक कोटी लिटर पाणी पुरवठा होत आहे, प्रशासनाच्या सतर्क नियोजनामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही अशी माहिती मुख्याधिकारी डॉक्टर कैलास चव्हाण, पाणीपुरवठा सभापती ज्ञानेश्वर गिरमे यांनी दिलेली आहे. गराडे तलावाचे पाणी दूषित झाल्याने, 28 मार्चपासून त्याचा पुरवठा स्थगित केला असून ,आता वीर योजनेतून दररोज 75 लाख लिटर आणि घोरवडी योजनेतून 25 लाख लिटर पाणी उंचलण्यात येत आहे, वीर धरण योजनेच्या तांत्रिक अडचणीवरही तोडगा काढण्यात आलेला आहे, वादळी वारा आणि लोड शेडिंग मुळे खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसू नये, म्हणून कांबळवाडी पंप हाऊसवर चारशे केवी क्षमतेची सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेली आहे, सध्याची मागणी आणि पुरवठा स्थिती 10 एमएलडी एक कोटी लिटर साठ हजार लोकसंख्या प्रतिव्यक्ती 140 लीटर पाण्याची दैनंदिन गरज एक दिवसाआड पाणीपुरवठा सध्या शहराला 50% भागाला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे, सौर ऊर्जेचा वापर वीज खंडित होण्यावर उपाय म्हणून 400 केवीचा सौर ऊर्जा प्रकल्प कांबळवाडी येथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे, प्रमुख जलस्त्रोत आणि नियोजन वीर धरणातून उपसात वाढ 50 लाख लिटर 75 लाख लिटर तांत्रिक अडचणी सोडून, उपसा वाढवला आहे, गराडे योजना सध्या बंद पाणी दूषित झाल्यामुळे, 28 मार्चपासून या योजनेचा पुरवठा स्थगित करण्यात आलेला आहे, नवीन प्रकल्प सासवडसाठी सुधारित वीर धरण पाणी पुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे, या योजनेसाठी 143 कोटी मंजूर झालेले आहेत, जलस्त्रोत साठा जलस्त्रोत आजचा साठा मागील वर्षाचा साठा वीर धरण 5,380 टीएमसी 5,110 टीएमसी गराडे तलाव 90 दशलक्ष घनफूट ९६% घोरवडी तलाव 97 दशलक्ष घनफूट पंचवीस टक्के 97 दशलक्ष घनफूट.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments