पुरंदर तालुक्यातील सासवड या ठिकाणी श्री भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी चैत्री उत्सवास सुरुवात सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक मुख्य संपादक पुरंदर प्राईम न्यूज: सासवडचे ग्रामदैवत श्री काळ भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी या देवतांचा उत्सव शुक्रवारी दि. 3 एप्रिल ते सोमवार दि. 6 एप्रिल या काळामध्ये होणार आहे, या निमित्ताने विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश (कारभारी)जगताप, भैरवनाथ चैत्य उत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय जगताप यांनी ही माहिती दिली. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, गाव पाटील संग्राम पाटील, चैत्र उतस्वाहाचे उपाध्यक्ष नितीन भोंगळे, सचिव विठ्ठल शिंदे, रवींद्र (पंत) जगताप, संजय चव्हाण आदी उपस्थित होते. शुक्रवारी दि.3 रोजी पहाटे भैरवनाथाची महापूजा सकाळी सात वाजता, ध्वज बांधून बगाड फिरवणे कार्यक्रम, सायंकाळी 5 ते पहाटे तीन वाजेपर्यंत श्रीची पालखी मिरवणूक होणार आहे, छबिण्यासाठी बक्षीसे ठेवण्यात आलेली आहेत, शनिवारी दि.4 रोजी सायंकाळी कुस्ती आखाडा होणार असून, स्वर्गवाशी नामदार चंदूकाका निवृत्ती जगताप यांच्या स्मरणार्थ माजी आमदार संजय जगताप यांच्याकडून शेवटच्या कुस्तीसाठी एक लाखाचा इनाम घोषित करण्यात आलेला आहे, रविवारी दि. 5 रोजी सकाळी आठ वाजता भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत किर्लोस्कर कंपनीच्या पाठीमागे वाघ डोंगरावर होणार आहेत, मंगळवारी दि. 7 रोजी शिखर शिंगणापूरहून येणाऱ्या तेल्या भुत्याच्या कावडीचे आगमन होणार आहे, अशी सविस्तर माहिती भैरवनाथ चैत्रीउत्सव मंडळाचे अध्यक्ष अजय जगताप यांनी ही सर्व माहिती प्रतिनिधीला दिली.
विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या "पुरंदर प्राईम न्यूज" या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलसाठी जिल्हा, तालुका, शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहेत. संपर्क, मुख्यसंपादक/ बापू राजाराम मुळीक, मो,9923070749.....( नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल...👉 वाट्सप नंबर,8483836284
0 Comments